Monday 29 July 2019

मराठवाड्यात 191.88 मि.मी. पाऊस
औरंगाबाद,दि. 29 (विमाका) :- मराठवाड्यात मागील काही दिवसांत ढगाळ वातावरण असले तरी पावसाचा जोर कमी आहे. गेल्या 24 तासात मराठवाड्यात अत्यल्प पावसाची नोंद झाली आहे.  विभागात आज सकाळपर्यंत नोंदल्या गेलेल्या आजपर्यंतच्या पावसाच्या एकूण आकेडवारी नुसार सरासरी 191.88 मि.मी  आहे.
जिल्हानिहाय  आजपर्यंत झालेल्या पावसाची आकडेवारी पुढील प्रमाणे आहे. नांदेड 242.28 मि.मी, औरंगाबाद- 232.88 मि.मी, हिंगोली -223.87 मि.मी, जालना - 210.45 मि.मी, परभणी -178.62 मि.मी, लातूर 163.63 मि.मी, उस्मानाबाद 156.67 मि.मी. आणि बीड 126.66 मि.मी.
विभागातील आठही जिल्ह्यातील सकाळपर्यंत मागील चोवीस तासांतील तालुक्यानिहाय पावसाची आकडेवारी पुढील प्रमाणे आहे. कंसातील आकडेवारी दि.1 जूनपासून आजवर पडलेल्या पावसाची सरासरी आहे. सर्व आकडेवारी मिलीमीटर परिणामात आहे.
औरंगाबाद जिल्हा- औरंगाबाद 9.50 (200.00), फुलंब्री 10.75 (276.75), पैठण 9.60 (154.14), सिल्लोड 25.25 (315.94), सोयगाव 26.00 (328.33), वैजापूर 7.40 (203.90), गंगापूर 9.89 (185.89), कन्नड 13.75 (243.00), खुलताबाद 12.67 (188.00). जिल्ह्यात एकूण 232.88 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.
जालना जिल्हा- जालना 5.50 (174.56), बदनापूर 7.20 (213.40), भोकरदन 18.50 (305.88), जाफ्राबाद 9.20 (238.40), परतूर 2.80 (190.28), मंठा 4.75 (199.50), अंबड 5.43 (189.14), घनसावंगी 4.71 (172.43), जिल्ह्यात एकूण 210.45 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.
परभणी जिल्हा- परभणी 2.25 (157.42), पालम 3.67 (143.42), पूर्णा 4.60 (202.40), गंगाखेड 6.75 (165.75), सोनपेठ 4.00 (185.00), सेलू 3.80 (156.80), पाथरी 2.67 (174.33), जिंतूर 3.33 (192.33), मानवत 3.67 (230.00), जिल्ह्यात एकूण पावसाची नोंद 178.62 मि.मी. झाली आहे.
हिंगोली जिल्हा- हिंगोली 4.86 (213.57), कळमनुरी 6.00 (258.75), सेनगाव 5.67 (218.50), वसमत 3.57 (136.29), औंढा नागनाथ 4.50 (292.25). जिल्ह्यात एकूण 223.87 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.

 नांदेड जिल्हा- नांदेड 5.25 (226.75), मुदखेड 11.00 (295.00), अर्धापूर 3.33 (221.32), भोकर 11.50 (251.75), उमरी 8.33 (260.79), कंधार 7.50 (220.33), लोहा 5.00 (197.03), किनवट 17.71 (278.19), माहूर 11.25 (308.44), हदगाव 9.29 (222.56), हिमायत नगर 17.67 (252.66), देगलूर 12.00 (153.16), बिलोली 11.00 (302.00), धर्माबाद 14.67 (218.67), नायगाव 4.80 (261.60), मुखेड 7.14 (206.29), जिल्ह्यात एकूण 242.28 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.
बीड जिल्हा- बीड 8.27 (117.64), पाटोदा 0.25 (147.00), आष्टी 2.43 (132.14), गेवराई 4.70 (103.00), शिरुर कासार 9.33 (94.33), वडवणी 10.50 (110.50), अंबाजोगाई 11.00 (115.00), माजलगाव 6.60 (180.73), केज 1.00 (127.57), धारुर 3.67 (113.33), परळी 15.40 (152.02), जिल्ह्यात एकूण 126.66 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.
लातूर जिल्हा- लातूर 1.00 (115.88), औसा 1.71 (90.57), रेणापूर 5.50 (146.25), उदगीर 6.29 (180.29), अहमदपूर 12.00 (228.17), चाकुर 10.00 (137.60), जळकोट 11.00 (223.50), निलंगा 3.63 (157.25), देवणी 4.00 (186.50), शिरुर अनंतपाळ 0.00 (170.33), जिल्ह्यात एकूण 163.63 मि.मी. पाऊस झाला आहे.
उस्मानाबाद जिल्हा- उस्मानाबाद 0.50 (144.50), तुळजापूर 0.29 (190.57), उमरगा 3.40 (186.40), लोहारा 0.00 (190.00), कळंब 0.50 (132.67), भूम 0.60 (170.10), वाशी 0.00 (148.33), परंडा 0.00 (90.80), जिल्ह्यात एकूण 156.67 मि.मी. पाऊस झाला आहे.
******
औरंगाबाद – जालना स्थानिक प्राधिकारी मतदार संघ
निवडणुकीसाठी 24 तास नियंत्रण कक्ष

औरंगाबाददिनांक 29  – महाराष्ट्र विधानपरिषदेच्या औरंगाबाद-तथा जालना स्थानिक प्राधिकारी मतदारसंघातील व्दिवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम भारत निवडणूक आयोगामार्फत 19 जुलै2019 रोजी घोषित करण्यात आला आहेत्यानुसार व्दिवार्षिक निवडणुकीसाठी 19ऑगस्ट रोजी मतदान होणार आहेनिवडणूक पूर्ण होण्याचा दिनांक 26 ऑगस्ट आहे.
या निवडणुकीसंदर्भातील तक्रारी दाखल करण्याकरिता निवडणुकीची अधिसुचना प्रसिध्द झाल्यापासून म्हणजेच दिनांक 25 जुलै 2019 पासून ते26 ऑगस्ट 2019 पर्यंत कक्ष क्रमांक 611,  सामान्य प्रशासन विभाग, 6 वा मजलाविस्तार इमारतमादाम कामा रोडहुतात्मा राजगुरु चौकमंत्रालय,मुंबई-400032 येथे 24×7 तत्वावर नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात येत आहेया निवडणुकी संदर्भात तक्रार दाखल करावयाची असल्यास या नियंत्रण कक्षात (022-22025059) या दुरध्वनी क्रमांकावर करावीअसे सहमुख्य निवडणूक अधिकारी व उपसचिव यांनी कळविले आहे
*********
                                                                                     
विवेकानंद महाविद्यालयात आज रोजगार मेळावा

औरंगाबाददिनांक 29  – विवेकानंद कलासरदार दलिपसिंग वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयजिल्हा कौशल्य विकासरोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रऔरंगाबाद (महाराष्ट्र शासनतसेच नॅशनल करिअर सर्व्हिस ,(श्रम व रोजगार मंत्रालयभारत सरकारयांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवार, 30 जुलै रोजी सकाळी 10 वाजता विवेकानंद कलासरदार दलिपसिंग वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयसमर्थनगरऔरंगाबाद येथे रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेले आहेमेळाव्यास विविध उद्योजकआणि उद्योजक कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित राहून एकूण 859 पदासाठी पात्र उमेदवारांच्या मुलाखती घेणार आहेतमेळाव्यास दहावीबारावीआयटीआयडिप्लोमापदवीधर व तांत्रिक पदवीधर तसेच नॉन टेक्नीकल उमेदवारांच्या प्रत्यक्ष मुलाखतीव्दारे निवड करणार आहेत.
तरी पात्र  इच्छुक उमेदवारांनी www.mahaswayam.gov.in  संकेतस्थळावर किंवा महाविद्यालयाच्या https;//forms.gle/9ecFWHQfl34oboVZ8 लिंकवर नोंदणीकरुन घ्यावी  मुळ कागदपत्र  बायोडेटाच्या 4 प्रतीसह मुलाखतीस प्रत्यक्ष उपस्थित राहावेअसे आवाहनमहाविद्यालयाचे संचालक डॉ अशोक गायकवाडमार्गदर्शन केंद्राचे सहायक संचालक एन.एन सुर्यवंशी  नॅशनल करिअर सर्व्हीसचे डॉअनिल जाधवयांनी केले आहेनोंदणीसाठी काही अडचणी असल्यास कार्यालयाच्या दूरध्वनी क्र. 0240-2334859 संपर्क साधावाअसे सहायक संचालक श्री.सूर्यवंशी यांनी कळविले आहे.
*********


                                                                                                   
प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी होणेसाठी
 दि. 31 जुलै पर्यंत मुदतवाढ
औरंगाबाददिनांक 29  – शासनाने खरीप हंगाम 2019 मध्ये प्रधानमंत्री पीक विमा योजना राज्यातील सर्व जिल्हयांत राबविण्याचानिर्णय घेतलेला असून या योजनेत कर्जदार  बिगर कर्जदार शेतकऱ्यांनी सहभाग घेण्याची अंतिम मुदत दिनांक 24 जुलै, 2019 अशी होतीतथापि,दिनांक  24 जुलै, 2019 चे शासन निर्णयानुसार खरीप हंगाम 2019 करिता योजनेत कर्जदार  बिगर कर्जदार शेतकऱ्यांनी सहभागी होण्याची मुदतवाढवून ती दिनांक 29 जुलै, 2019 अशी करण्यात आली होती.
तथापिशेतकऱ्यांना येणाऱ्या तांत्रिक अडचणी विचारात घेता त्यांना पुरेसा कालावधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने प्रधानमंत्री पिक विमायोजना खरीप हंगाम 2019 मध्ये शेतकऱ्यांना सहभागी होण्यासाठी दिनांक 29 जुलै, 2019 पासून दिनांक 31 जुलै, 2019 पर्यंत पुन:श्च मुदतवाढदेण्याचा राज्य शासनाने निर्णय घेतला आहे.  
       योजनेत सहभागी होण्यासाठी  बँक  `आपले सरकार सेवा केंद्र` (डिजीटल सेवा केंद्रयांचे मार्फत बिगर कर्जदार शेतकऱ्यांचे विमा अर्जस्विकारण्यात येत आहेततरी शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत पीक विमा संरक्षण मिळणेस्तव विहित मुदतीपुर्वी नजिकचे बँक  आपलेसरकार सेवा केंद्रावर विमा हप्त्यासह तसेच आवश्यक कागदपत्रांसह विमा प्रस्ताव सादर करावा.
अधिक माहितीसाठी तात्काळ नजीकच्या विभागीय कृषि सह संचालकजिल्हा अधिक्षक कृषि अधिकारीउपविभागीय कृषि अधिकारीतालुकाकृषि अधिकारी यांचे कार्यालयाशी तसेच नजीकच्या बँकआपले सरकार सेवा केंद्र (डिजीटल सेवा केंद्रयांचेशी संपर्क साधावाअसे आवाहनकृषीमंत्री डॉअनिल बोंडेयांनी केले आहे.
******



Friday 26 July 2019

लेखा व कोषागारे संचालनालयाच्या परीक्षेची निवड यादी
महाकोष संकेतस्थळावर उपलब्ध

औरंगाबाद, दि. 26 ---: महाराष्ट्र राज्याच्या संचालनालय, लेखा व कोषागारे व स्थानिक निधी लेखा परीक्षा विभागातील गट क संवर्गातील परीक्षेचा निकाल शासनाच्या महाकोष संकेतस्थळावर विभागनिहाय उपलब्ध करण्यात आला आहे. उत्तीर्ण उमेदवारांनी कागदपत्र पडताळणीसंदर्भात २९ जुलै २०१९ पर्यंत उपस्थितीबाबत लेखा व कोषागारे विभागामार्फत कळविण्यात येणार असल्याची माहिती लेखा व कोषागारे विभागाचे संचालक यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.
महाराष्ट्र राज्याच्या लेखा व कोषागारे संचालनालय व स्थानिक निधी लेखा परीक्षा विभागातील गट क संवर्गातील लेखा लिपीक, लेखा परीक्षा लिपीक व कनिष्ठ लेखापाल तसेच कनिष्ठ लेखा परीक्षक या पदांसाठी ऑनलाईन पद्धतीने परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. या परीक्षेचा निकाल २० जुलै पासून https://mahakosh.maharashtra.gov.in या संकेतस्थळावरील employee corner अंतर्गत Recruitment Rules  येथे विभागनिहाय याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. उत्तीर्ण उमेदवारांना वैयक्तिकरित्या संपर्क साधून कागदपत्रांची पडताळणी करण्याकरिता उपस्थितीबाबत कळविण्यात येणार आहे.
याबाबतची सूचना २४ जुलै २०१९ पर्यंत प्राप्त न झाल्यास उमेदवारांनी आवश्यक ती सर्व मूळ कागदपत्रे छायांकित प्रतींसह (दोन संच) विभागनिहाय नवी मुंबई,पुणे, नाशिक, औरंगाबाद, मरावती आणि नागपूर येथील सहसंचालक लेखा कोषागारे कार्यालय तसेच स्थानिक निधी लेखा परीक्षा विभाग कार्यालयात २९ जुलैपर्यंत उपस्थित रहावे, असेही लेखा व कोषागारे विभागाचे संचालक यांनी पत्रकात नमूद केले आहे.
००००

महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा पूर्व परिक्षा दि. 28 जुलै रोजी

औरंगाबाददि.26 ---: महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत जिल्हा केंद्रावर महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा-2019 दिनांक 28 जुलै 2019 रोजी सकाळी 11 ते 12 या कालावधीत घेण्यात येणार आहेअसे जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत प्रसिद्धी पत्राद्वारे कळविण्यात आले आहे.
ही परीक्षा चार उपकेंद्रांवर घेण्यात येणार आहे. यामध्ये 1) मौलाना आझाद कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, (सायन्स बिल्डींग भाग-अ) रोझा बाग, हर्सूल रोड 2) मौलाना आझाद कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, (टॉम पॅट्रिक इमारत भाग-ब) रोझा बाग, हर्सूल रोड 3) डॉ. सौ. इंदिराबाई भास्करराव पाठक महिला कला महाविद्यालय, समर्थनगर 4) शासकीय ज्ञान-विज्ञान महाविद्यालय, शासकीय सुभेदारी विश्रामगृहाजवळ, विश्वासनगर,  औरंगाबाद. या परिक्षेसाठी 1464 उमेदवारांना प्रवेशपत्रे पाठविण्यात आली आहेया परीक्षेच्या कामासाठी  172 अधिकारी / कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
परीक्षा कक्षात प्रवेश मिळविण्यासाठी उमेदवारांनी आधार कार्ड, निवडणूक आयोगाचे ओळखपत्रपासपोर्टपॅनकार्ड किंवा स्मार्ट कार्ड प्रकारचे ड्रायव्हींग लायसन्स यापैकी किमान कोणतेही एक मुळ ओळखपत्र व त्यांची छायांकित प्रत सोबत आणणे अनिवार्य आहे.
            परीक्षा कक्षामध्ये परिक्षेच्या अर्धा तास अगोदर उमेदवारास कोणत्याही परिस्थितीत प्रवेश दिला जाणार नाहीपरीक्षेच्या वेळी कक्षात प्रवेश प्रमाणपत्रकाळ्या व निळ्या शाईचे बॉल पॉइंट पेनओळखपत्र व ओळखपत्राची छायांकित प्रत या व्यतिरिक्त अन्य कोणतेही साहित्य अथवा वस्तु परीक्षा कक्षामध्ये घेऊन जाण्यास उमदेवारास परवानगी असणार नाही.
            उमेदवाराने त्याच्या सोबत डिजीटल डायरीमायक्रोफोनमोबाईलब्ल्युटुथकॅमेराफोन किंवा तत्सम कोणतेही संदेशवहन उपकरणकोणतेही इलेक्ट्रॉनिक साहित्य परीक्षा कक्षामध्ये घेवून जाण्यास सक्त मनाई आहेअसे साहित्य आणले तर उमेदवारांना स्वत:च्या जबाबदारीवर परीक्षा केंद्राच्या आवाराच्या मुख्य दरवाजाबाहेरच ठेवावे लागेलतसेच असे साहित्य ठेवण्याची जबाबदारी आयोगाची असणार नाहीपरीक्षा केंद्राच्या आवाराच्या मुख्य दरवाजाच्या आत असे साहित्य आणल्यास उमेदवारांवर फौजदारी व प्रशासकीय कारवाईसह त्यांना आयोगाच्या आगामी परिक्षांकरीता बंदी घालण्यात येईलपरिक्षा केंद्राच्या प्रवेशदारावरच परीक्षेच्या दिवशी उमेदवाराची तपासणी पोलीसामार्फत करण्यात येणार आहेपरीक्षेच्या पर्यवेक्षणाकरीता आयोगाचे अधिकारी उपस्थित राहणार आहे तसेच मा. जिल्हाधिकारी स्वत: पर्यवेक्षणावर लक्ष ठेवणार असल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत प्रसिद्धी पत्राद्वारे कळविण्यात आले आहे.
0000

                                    गाई/म्हशीशेळी/मेंढी गट वाटपकुक्कुट पक्षी संगोपन
 योजनांकरीता अर्ज करण्याचे आवाहन

औरंगाबाददि.26 ---: नाविन्यपूर्ण योजनांतर्गत सर्वसाधारण, अनुसूचित जाती या प्रवर्गातील १८ वर्षावरील अर्जदारांकडून दुधाळ गाई/म्हशीचे वाटप करणे, शेळी /मेंढी गट वाटप करणे, मांसल कुक्कुट पक्षी संगोपन करणे या योजनांकरिता ८ ऑगस्ट पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. योजनेची पूर्ण माहिती व अर्ज करण्याची कार्यपद्धती या बाबतचा संपूर्ण तपशील https//ah.mahabms.com या संकेतस्थळावर व गुगल प्ले स्टोअर वरील AH MAHABMS या मोबाईल अॅपवर उपलब्ध आहे. अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीनेच स्वीकारले जातील याची नोंद घ्यावी. तरी इच्छुक अर्जदारांनी वर नमूद विहित कालावधीत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावेत, असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त यांनी केले आहे.
अर्ज भरतांना अर्जदाराने नोंदविलेल्या भ्रमणध्वनी  क्रमांकावर अर्जाच्या स्थितीबाबत एसएमएसद्वारे संदेश पाठविण्यात येणार असल्याने कोणत्याही परिस्थितीत अर्जदाराने आपला भ्रमणध्वनी क्रमांक योजनेंतर्गत अंतिम निवड होईपर्यंत बदलू नये.
अर्जदाराची प्राथमिक निवड अर्जदाराने ऑनलाईन अर्जात नमूद केलेल्या माहितीनुसार संगणकाद्वारे करण्यात येणार असली तरी अंतिम निवड ही त्याने अपलोड केलेल्या कादाग्पात्रांच्या आधारेच करण्यात येईल, याची नोंद घ्यावी. योजनेबाबत अधिक माहितीसाठी तालुक्याचे पशुधन विकास अधिकारी (विस्तार), पंचायत समिती अथवा जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त, जिल्हा औरंगाबाद यांच्याशी संपर्क साधावा.
००००

Thursday 25 July 2019

खुल्या प्रवर्गातील गुणवंतांसाठीच्या
उच्च शिक्षण शिष्यवृत्ती योजनेस मुदतवाढ

औरंगाबाद, दिनांक 25  – खुल्या प्रवर्गातील गुणवंत मुलामुलींना 2018-19 पासून परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजना शासनाने सुरू केली आहे. शैक्षणिक वर्ष 2019-20 करीता या योजनेसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. सदर अर्ज विभागीय सहसंचालक, उच्च शिक्षण औरंगाबाद विभाग, औरंगाबाद येथे सादर करण्या31 जुलै पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. दि. ३१ जुलै रोजी सायंकाळी पाच वाजेपर्यंत अर्जदारांना अर्ज सादर करता येतील, असे उच्च शिक्षण ‍विभागाच्या सहसंचालक यांनी कळविले आहे.
राज्यातील खुल्या प्रवर्गातील गुणवंत विद्यार्थी पदव्युत्तर, पदविका, पी.एच.डी अभ्यासक्रमांसाठी किंवा रँकिंग 200 च्या आतील असलेल्या परदेशातील शैक्षणिक संस्थेमध्ये प्रवेश घेतला असेल अथवा प्रवेश घेतील अशा 20 विद्यार्थ्यांना प्रतिवर्षी परदेशी शिष्यवृत्ती मंजूर करण्याबाबतची योजना शैक्षणिक वर्ष 2018-19 पासून सुरू करण्यात आली. उच्च शिक्षण संचालनालयांतर्गत येणाऱ्या कला, वाणिज्य, विज्ञान व विधी अभ्यासक्रमांना प्रत्येकी दोन संच मंजूर आहेत.
****

तरुणांसाठी औरंगाबादमध्ये
ऊरी द सर्जिकल स्ट्राईक चित्रपट दाखवणार

औरंगाबाद, दि. 25 : जिल्हा सैनिक कार्यालयच्या वतीने २६ जुलै २०१९ रोजी कारगिल विजय दिवस औरंगाबाद जिल्ह्यात ऊरी द सर्जिकल स्ट्राईक हा चित्रपट १८ ते २५ वयोगटातील युवक-युवतींसाठी मोफत दाखवून साजरा करण्यात येणार आहे. चित्रपटाची वेळ सकाळी १० वा. आहे.
शहरातील अंजली बिग सिनेमा गृह, मुक्ता नुपूर, प्रोझोन आयनॉक्स, अभिनय, अभिनित, रिलायंस आयनॉक्स, अप्सरा, मोहन, वैजापूर येथील  स्वस्तिक सिनेमागृहात दाखविण्यात येणार असल्याचे जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी कळविले आहे. अंजलीमध्ये (२९०) (एकूण दर्शक), मुक्ता नुपूर (२७०), प्रोझोन आयनॉक्स (२००), अभिनय (६१७), अभिनित (२२९), रिलायंस आयनॉक्स (३२०), अप्सरा (३२२), मोहन (१६९), वैजापूर येथील स्वस्तिक (४९०) प्रेक्षक उपस्थित राहणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
****
प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी होण्यासाठी
२९ जुलै पर्यंत मुदतवाढ

औरंगाबाद, दिनांक २५  – शासनाने खरीप हंगाम २०१९ मध्ये प्रधानमंत्री पिक विमा योजना राज्यातील सर्व जिल्ह्यात राबविण्याचा निर्णय घेतलेला आहे. या योजनेत कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांनी सहभाग घेण्यासाठी अंतिम मुदत २४ जुलै होती. तथापि २४ जुलैच्या शासन निर्णयानुसार खरीप हंगाम २०१९ करिता योजनेत कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांनी सहभागी होण्यास २९ जुलै पर्यंत मुदत वाढविण्याचा राज्य शासनाने निर्णय घेतला आहे.
योजनेत सहभागी  होण्यासाठी बँक व ‘आपले सरकार सेवा केंद्र’ (डिजिटल सेवा केंद्र) यांच्या मार्फत बिगर कर्जदार शेतकऱ्यांचे विमा अर्ज स्वीकारण्यात येत आहेत. तरी शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत पीक विमा संरक्षण मिळण्यास्तव विहित मुदतीपूर्वी नजीकच्या बँक व आपले सरकार सेवा केंद्रावर विमा हप्त्यासह तसेच आवश्यक कागदपत्रांसह विमा प्रस्ताव सादर करावा.
अधिक माहितीसाठी तत्काळ नजीकच्या कृषी सह संचालक, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, उप विभागीय कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी यांच्या कार्यालयाशी तसेच नजीकच्या बँक, ‘आपले सरकार सेवा केंद्र’ (डिजिटल सेवा केंद्र) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन कृषी मंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी केले आहे.
****