Monday 5 December 2016



खादी ग्रामउद्योगाच्या प्रदर्शनाचे विभागीय
आयुक्त कार्यालयात  उद्घाटन
            औरंगाबाद, दि. 5 :खादी ग्राम उद्योग विभागाच्यावतीने विभागीय आयुक्त  कार्यालयाच्या परिसरात आयोजित प्रदर्शनाचे उद्घाटन विभागीय आयुक्त  डॉ. उमाकांत दांगट यांच्य हस्ते आज येथे करण्यात आले.
            यावेळी खादी ग्राम उद्योग  (मुंबई) चे मुख्य कार्यकारी अधिकारी रिचा बागला, अपर आयुक्त गोविंद बोडखे, उपायुक्त पारस बोथरा, उपजिल्हाधिकारी शिवाजी शिंदे, जिल्हा समिती औरंगाबादचे अध्यक्ष संतोष माने पाटील आदीची उपस्थिती होती.
खादी वापराला प्रोत्साहन मिळण्यासाठी हे प्रदर्शन आयोजित करण्यात आले असून दि. 5 डिसेंबर ते 7 डिसेंबर दरम्यान प्रदर्शन सर्वांसाठी खुले असणार आहे, तरी या प्रदर्शनाचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हा ग्राम उद्योग अधिकारी राजकुमार डांगर यांनी केले आहे.


Saturday 3 December 2016



छत्रपती शिवाजी महाराज पुरान वस्तू संग्रहालयात
 नवव्या हेरिटेज वॉकचे आयोजन
            औरंगाबाद, दि. 3 : येथील श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज पुरान वस्तू संग्रहालयात औरंगाबाद पर्यटन प्रतिष्ठाणच्या वतीने आज  सकाळी 7 वाजता नवव्या हरिटेज वॉकचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी जिल्हाधिकारी डॉ. निधी पांडेय, अपर जिल्हाधिकारी पी.एल.सोरमारे, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे प्रादेशिक व्यवस्थापक अण्णासाहेब शिंदे, जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी वासुदेव सोळंखे, आदी मान्यवर उपस्थित होते.
            यावेळी छत्रपती शिवाजी महाराज पुरान वस्तू संग्रहालया संदर्भात डॉ. सर्वेश नांद्रेकर यांनी संपुर्ण माहिती उपस्थितांना दिली . या मध्ये शिवरायांची युध्दनीती, मराठकालीन जनजीवन, पुरातन नाणे , मराठे सरदार उदय, सातवाहन दालन, तसेच वस्तू संग्रालय परिसराची माहिती दिली. 
ऐतिहासिक औरंगाबाद परीसराची जडणघडण, उभारणी तसेच विविध कला व संस्कृतीचा विकास इत्यादी ऐतिहासिक ठेवा या बाबतची माहिती सर्वांना असावी व यातून औरंगाबाद ऐतिहासिक, सांस्कृतिक पौराणिक महत्व सर्वांना कळावे या उद्देशाने ‘‘ औरंगाबाद पर्यटन प्रतिष्ठाणच्या ’’ वतीने ‘‘ऑगस्ट महिन्या पासून प्रत्येक महिन्याच्या पहिला व तिसरा शनिवार या दिवशी सकाळी 7 ते 9 वाजेपर्यंत हेरिटेज वॉक ’’ उपक्रम सुरु करण्यात आला आहे. पहिला हेरीटेज वॉक सोनेरी महल पासून सुरू करण्यात आला असून दुसरा हेरीटेज वॉक नौखंडा पॅलेस, तिसरा हेरीटेज वॉक सिध्दार्थ उद्यान, चौथा हेरीटेज वॉक हिमायत बाग व दिल्ली गेट, पाचवा हेरीटेज वॉक औरंगाबाद लेणी, सहावा हेरीटेज वॉक सलीम अली सरोवर, सातवा हेरीटेज वॉक नहर-ए- अंबरी येथे आयोजित करण्यात आला होता. या हेरीटेज वॉकला नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद मिळालेला आहे.
            यापुढील हेरिटेज वॉक दिनांक 17 डिसेंबर 2016 रोजी सकाळी 7 वाजता गुलशन महल येथे आयेजित करण्यात आलेले आहे. आजच्या हेरिटेज वॉकला पर्यटन प्रेमी, अभ्यासक, परिसरातील नागरिक उपस्थित होते.