Friday 26 July 2019

लेखा व कोषागारे संचालनालयाच्या परीक्षेची निवड यादी
महाकोष संकेतस्थळावर उपलब्ध

औरंगाबाद, दि. 26 ---: महाराष्ट्र राज्याच्या संचालनालय, लेखा व कोषागारे व स्थानिक निधी लेखा परीक्षा विभागातील गट क संवर्गातील परीक्षेचा निकाल शासनाच्या महाकोष संकेतस्थळावर विभागनिहाय उपलब्ध करण्यात आला आहे. उत्तीर्ण उमेदवारांनी कागदपत्र पडताळणीसंदर्भात २९ जुलै २०१९ पर्यंत उपस्थितीबाबत लेखा व कोषागारे विभागामार्फत कळविण्यात येणार असल्याची माहिती लेखा व कोषागारे विभागाचे संचालक यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.
महाराष्ट्र राज्याच्या लेखा व कोषागारे संचालनालय व स्थानिक निधी लेखा परीक्षा विभागातील गट क संवर्गातील लेखा लिपीक, लेखा परीक्षा लिपीक व कनिष्ठ लेखापाल तसेच कनिष्ठ लेखा परीक्षक या पदांसाठी ऑनलाईन पद्धतीने परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. या परीक्षेचा निकाल २० जुलै पासून https://mahakosh.maharashtra.gov.in या संकेतस्थळावरील employee corner अंतर्गत Recruitment Rules  येथे विभागनिहाय याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. उत्तीर्ण उमेदवारांना वैयक्तिकरित्या संपर्क साधून कागदपत्रांची पडताळणी करण्याकरिता उपस्थितीबाबत कळविण्यात येणार आहे.
याबाबतची सूचना २४ जुलै २०१९ पर्यंत प्राप्त न झाल्यास उमेदवारांनी आवश्यक ती सर्व मूळ कागदपत्रे छायांकित प्रतींसह (दोन संच) विभागनिहाय नवी मुंबई,पुणे, नाशिक, औरंगाबाद, मरावती आणि नागपूर येथील सहसंचालक लेखा कोषागारे कार्यालय तसेच स्थानिक निधी लेखा परीक्षा विभाग कार्यालयात २९ जुलैपर्यंत उपस्थित रहावे, असेही लेखा व कोषागारे विभागाचे संचालक यांनी पत्रकात नमूद केले आहे.
००००

महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा पूर्व परिक्षा दि. 28 जुलै रोजी

औरंगाबाददि.26 ---: महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत जिल्हा केंद्रावर महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा-2019 दिनांक 28 जुलै 2019 रोजी सकाळी 11 ते 12 या कालावधीत घेण्यात येणार आहेअसे जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत प्रसिद्धी पत्राद्वारे कळविण्यात आले आहे.
ही परीक्षा चार उपकेंद्रांवर घेण्यात येणार आहे. यामध्ये 1) मौलाना आझाद कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, (सायन्स बिल्डींग भाग-अ) रोझा बाग, हर्सूल रोड 2) मौलाना आझाद कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, (टॉम पॅट्रिक इमारत भाग-ब) रोझा बाग, हर्सूल रोड 3) डॉ. सौ. इंदिराबाई भास्करराव पाठक महिला कला महाविद्यालय, समर्थनगर 4) शासकीय ज्ञान-विज्ञान महाविद्यालय, शासकीय सुभेदारी विश्रामगृहाजवळ, विश्वासनगर,  औरंगाबाद. या परिक्षेसाठी 1464 उमेदवारांना प्रवेशपत्रे पाठविण्यात आली आहेया परीक्षेच्या कामासाठी  172 अधिकारी / कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
परीक्षा कक्षात प्रवेश मिळविण्यासाठी उमेदवारांनी आधार कार्ड, निवडणूक आयोगाचे ओळखपत्रपासपोर्टपॅनकार्ड किंवा स्मार्ट कार्ड प्रकारचे ड्रायव्हींग लायसन्स यापैकी किमान कोणतेही एक मुळ ओळखपत्र व त्यांची छायांकित प्रत सोबत आणणे अनिवार्य आहे.
            परीक्षा कक्षामध्ये परिक्षेच्या अर्धा तास अगोदर उमेदवारास कोणत्याही परिस्थितीत प्रवेश दिला जाणार नाहीपरीक्षेच्या वेळी कक्षात प्रवेश प्रमाणपत्रकाळ्या व निळ्या शाईचे बॉल पॉइंट पेनओळखपत्र व ओळखपत्राची छायांकित प्रत या व्यतिरिक्त अन्य कोणतेही साहित्य अथवा वस्तु परीक्षा कक्षामध्ये घेऊन जाण्यास उमदेवारास परवानगी असणार नाही.
            उमेदवाराने त्याच्या सोबत डिजीटल डायरीमायक्रोफोनमोबाईलब्ल्युटुथकॅमेराफोन किंवा तत्सम कोणतेही संदेशवहन उपकरणकोणतेही इलेक्ट्रॉनिक साहित्य परीक्षा कक्षामध्ये घेवून जाण्यास सक्त मनाई आहेअसे साहित्य आणले तर उमेदवारांना स्वत:च्या जबाबदारीवर परीक्षा केंद्राच्या आवाराच्या मुख्य दरवाजाबाहेरच ठेवावे लागेलतसेच असे साहित्य ठेवण्याची जबाबदारी आयोगाची असणार नाहीपरीक्षा केंद्राच्या आवाराच्या मुख्य दरवाजाच्या आत असे साहित्य आणल्यास उमेदवारांवर फौजदारी व प्रशासकीय कारवाईसह त्यांना आयोगाच्या आगामी परिक्षांकरीता बंदी घालण्यात येईलपरिक्षा केंद्राच्या प्रवेशदारावरच परीक्षेच्या दिवशी उमेदवाराची तपासणी पोलीसामार्फत करण्यात येणार आहेपरीक्षेच्या पर्यवेक्षणाकरीता आयोगाचे अधिकारी उपस्थित राहणार आहे तसेच मा. जिल्हाधिकारी स्वत: पर्यवेक्षणावर लक्ष ठेवणार असल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत प्रसिद्धी पत्राद्वारे कळविण्यात आले आहे.
0000

                                    गाई/म्हशीशेळी/मेंढी गट वाटपकुक्कुट पक्षी संगोपन
 योजनांकरीता अर्ज करण्याचे आवाहन

औरंगाबाददि.26 ---: नाविन्यपूर्ण योजनांतर्गत सर्वसाधारण, अनुसूचित जाती या प्रवर्गातील १८ वर्षावरील अर्जदारांकडून दुधाळ गाई/म्हशीचे वाटप करणे, शेळी /मेंढी गट वाटप करणे, मांसल कुक्कुट पक्षी संगोपन करणे या योजनांकरिता ८ ऑगस्ट पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. योजनेची पूर्ण माहिती व अर्ज करण्याची कार्यपद्धती या बाबतचा संपूर्ण तपशील https//ah.mahabms.com या संकेतस्थळावर व गुगल प्ले स्टोअर वरील AH MAHABMS या मोबाईल अॅपवर उपलब्ध आहे. अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीनेच स्वीकारले जातील याची नोंद घ्यावी. तरी इच्छुक अर्जदारांनी वर नमूद विहित कालावधीत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावेत, असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त यांनी केले आहे.
अर्ज भरतांना अर्जदाराने नोंदविलेल्या भ्रमणध्वनी  क्रमांकावर अर्जाच्या स्थितीबाबत एसएमएसद्वारे संदेश पाठविण्यात येणार असल्याने कोणत्याही परिस्थितीत अर्जदाराने आपला भ्रमणध्वनी क्रमांक योजनेंतर्गत अंतिम निवड होईपर्यंत बदलू नये.
अर्जदाराची प्राथमिक निवड अर्जदाराने ऑनलाईन अर्जात नमूद केलेल्या माहितीनुसार संगणकाद्वारे करण्यात येणार असली तरी अंतिम निवड ही त्याने अपलोड केलेल्या कादाग्पात्रांच्या आधारेच करण्यात येईल, याची नोंद घ्यावी. योजनेबाबत अधिक माहितीसाठी तालुक्याचे पशुधन विकास अधिकारी (विस्तार), पंचायत समिती अथवा जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त, जिल्हा औरंगाबाद यांच्याशी संपर्क साधावा.
००००