Sunday 2 October 2016



मराठवाडा विभागात सरासरी
35.18  मि.मि. पाऊस

        औरंगाबाद, दि. 2: मराठवाडा विभागात आज दि. 2 ऑक्टोबर रोजी सकाळी आठ वाजता संपलेल्या 24 तासात सरासरी  35.18  मिलीमिटर पावसाची नोंद झाली. या कालावधीत लातूर जिल्हयात सर्वाधिक 69.75  मि.मी. पाऊस झाला  तर औरंगाबाद जिल्हयात सर्वात कमी  7.08 मि.मि. पाऊस झाला.
            विभागात दि. 2 ऑक्टोबर रोजी झालेला जिल्हानिहाय पाऊस पुढीलप्रमाणे असून सर्व आकडेवारी मिलीमिटर परिमाणात आहे. कंसातील आकडेवारी चालु हंगामातील आजवरच्या  एकूण सरासरी पावसाची आहे.
औरंगाबाद 7.08 (571.49 ) जालना 12.25 (739.68 ) परभणी  29.09 (805.40 ) हिंगोली 38.00  (883.24 ) नांदेड 32.31 (1020.56 ) बीड 50.64 (793.62 ) लातूर 70.34 (1063.04) उस्मानाबाद  41.69  (803.51 ). विभागात आजवर अपेक्षित सरासरीच्या 116.25  तर वार्षिक सरासरीच्या 107.20  टक्के पाऊस झाला आहे.