Wednesday 24 July 2019

तहसीलनिहाय आदर्श आचारसंहिता,
कायदा  सुव्यवस्था कक्ष स्थापन करण्याचे निर्देश

औरंगाबाद,दि. 24 :------ औरंगाबाद-जालना स्थानिक प्राधिकारी विधान परिषद निवडणुकीत आदर्श आचारसंहितेचा भंग होऊ नये म्हणून तहसीलकार्यालयनिहाय आदर्श आचार संहिता कक्षकायदा  सुव्यवस्था कक्ष स्थापन करण्याचे, कार्यक्षेत्रात आदर्श आचार संहितेचे काटकोरप्रभावीपणे पालन करावेनिर्देशअपर जिल्हादंडाधिकारी तथा आचार संहिता कक्षाचे प्रमुख यांनी सर्व उपविभागीय अधिकारीतहसीलदार यांना दिले आहेत.
कक्ष स्थापन करून या कक्षात पुरेसे अधिकारीकर्मचाऱ्यांची नियुक्ती आदेश आपापल्या स्तरावरून काढावेत, त्याचबरोबर आपल्या अधिनस्त कार्यक्षेत्रातअनाधिकृत राजकीय पोस्टर्सबॅनर्सपॉम्पलेट्सपेंटींग्जहोर्डिंग्स आदी काढून टाकण्याबाबत कार्यवाही करून अपर जिल्हादंडाधिकारी कार्यालयास अहवाल सादरकरावाअसेही दिलेल्या आदेशात नमूद आहे.
*****

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत
करिअर गाईडस आणि औद्योगिक आस्थापना संवाद मार्गदर्शन

औरंगाबाद,दि.24-: औद्योगिक प्रशिक्षण संस्था, (मुलीचीऔरंगाबाद येथे करीअर गाईडस आणि औद्योगिक आस्थापनाच्या संवाद व मार्गदर्शन कार्यक्रम नुकताच संपन्न झालाकार्यक्रमास उद्योजक अर्जुन गायकवाडउद्योजिका अदीती  लड्डा , टयुब वाळुज व जी आय एस चे रविशंकर हे हजर होतेसुरुवातीला संस्थेविषयी माहिती प्राचार्य एन.एन आहेरकर यांनी दिलीअदीती लड्डा यांनी द्ष्टीकोन व कौशल्य ज्ञान  या तीन गोष्टीवरउद्योजक होताना लक्ष केंद्रीत केले पाहीजेकाळानुसार उद्योजक व प्रशिक्षणार्थी व शिक्षक यांनी अद्यावत राहावयाचे मार्गदर्शन केले.
अर्जुन गायकवाड यांनी उद्योजक होण्यासाठी स्वत:ला आलेल्या अडचणी व त्यावर केलेली मात स्वत:चे  अनुभव कथन केले व सर्व प्रशिक्षणार्थी यांना आय.टी.आय पास झालेले अनेक प्रशिक्षणार्थी आज औद्योगिक क्षेत्रामध्ये स्वतअद्योजक आहेप्रशिक्षणार्थीना ध्येय निश्चित करुन ध्येयासाठी सर्व अडचणीवर मात करुन ध्येय पुर्ण करावे आणि आपण करणारे काम 100   करुन कामामध्ये सातत्य ठेवावेअसे सांगितलेयानंतर प्रशिक्षणार्थी प्रश्न उत्तरे कार्यक्रम झाला.
या कार्यक्रमाचे सुत्र संचालन एस.बी कुलकर्णी यांनी केले . डी.एफ निकमश्रीमती चौथमलसय्यद एस.एन खिल्लारेयांनी नियोजनात सहाय्य केले.
*****

विभागीयस्तरावरील लोकशाही दिन व महिला लोकशाही दिनाचे
13 ऑगस्टला आयोजन
औरंगाबाद,दि. 24:- विभागीयस्तरावरील लोकशाही दिन व विभागीय महिला लोकशाही दिन महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी ठेवण्यात येतो. परंतु 12 ऑगस्ट रोजी 'बकरी ईद' च्या निमित्ताने सार्वजनिक सुट्टी असल्याने त्यानंतर येणारा कामकाजाचा दिवस मंगळवार, दि.13 ऑगस्ट 2019 रोजी सकाळी 11.00 वा. या लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आले आहे.  
तक्रार करण्यासाठीचे अर्ज 15 दिवस अगोदर दिनांक 29 जुलै   2019 पर्यंत विहित नमुना प्रप्रत्र-1(क) मध्ये दोन प्रतीत आवश्यक त्या कागदपत्रासह विभागीय आयुक्त कार्यालयाचे आवक शाखा प्रमुख (नायब तहसिलदार) यांच्याकडे  स्विकारण्यात येणार आहे.विहित नमुना अर्जही  प्रप्रत्र-1(क) आवक शाखेत  उपलब्ध करून देण्यात आला आहे. तसेच  विभागीय महिला लोकशाही दिनासाठी पिडीत महिलांनी विहीत नमुन्यातील मुदत पुर्व अर्ज विभागीय उप आयुक्त, महिला व बाल विकास, खोकडपुरा औरंगाबाद तथा सदस्य सचिव यांच्याकडे सादर करावे.
अर्जाच्या दोन प्रती विभागीय लोकशाही दिनाच्या दिवशी विभागीय आयुक्त यांच्याकडे पुन्हा सादर कराव्यात. विहित नमुन्यात आवश्यक कागदपत्रांसह अर्ज सादर करणाऱ्या नागरिकांनाच 13 ऑगस्ट 2019 सकाळी 11.00 वा. समक्ष अर्ज सादर करण्याची परवानगी राहील. तसेच ज्यांनी यापुर्वीच्या ‍विभागीय स्तरावरील लोकशाही दिनी तक्रार अर्ज दिलेले असतील परंतू त्यावर अद्याप कार्यवाही झाली नाही अशा प्रकरणात त्यांना पुन्हा अर्ज देता येणार नाही. असे विभागीय आयुक्त कार्यालयाने कळविले आहे.
******
फॉर्म नंबर 17 साठी आता ऑनलाईन प्रक्रिया !
दहावी, बारावी परीक्षेसाठी २९ जुलैपासून नोंदणी
औरंगाबाद, दि. २४:--- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च्‍ माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्च २०२० मध्ये घेण्यात येणाऱ्या दहावी, बारावीच्या परीक्षेस खासगी विद्यार्थ्यांसाठी नावनोंदणी अर्ज (फॉर्म-१७) ऑनलाईन प्रक्रियेद्वारे २९ जुलै ते २४ ऑगस्टदरम्यान स्वीकारण्यात येणार आहेत, अशी माहिती मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी दिली आहे.
खासगी विद्यार्थ्यांनी इयत्ता दहावी व बारावीसाठी नावनोंदणी अर्ज (फॉर्म-१७) ऑनलाईन पद्धतीनेच भरावे लागणार आहेत. त्यामुळे ऑफलाईन अर्ज स्वीकारला जाणार नाही. विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी दहावीसाठी http://form17.mh-ssc.ac.in तर बारावीसाठी http://form17.mh-hsc.ac.in या संकेतस्थळांचा वापर करावा. अर्ज भरण्यासाठीच्या सूचना संकेतस्थळावर मराठी व इंग्रजीमधून उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. यामध्ये विद्यार्थ्यांना त्यांच्या पत्त्यानुसार व त्याने निवडलेल्या माध्यमनिहाय संपर्क क्रमांकाची यादी दिसेल. त्यापैकी एका संपर्क केंद्राची निवड विद्यार्थ्याने करावयाची आहे. या संपर्क केंद्रामार्फत प्रकल्प, प्रात्यक्षिक परीक्षा, श्रेणी विषयासंदर्भातील कामकाज व अनुषंगिक मूल्यमापन करण्यात येईल.
अर्ज भरण्याच्या तारखा:
· नावनोंदणी अर्ज ऑनलाईन भरणे - २९ जुलै ते २४ ऑगस्ट
· मूळ अर्ज, शुल्क, कागदपत्रे, संपर्क केंद्र शाळा, कनिष्ठ महाविद्यालयात जमा करणे - ३० जुलै ते २६ ऑगस्ट
· संपर्क केंद्र शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांनी अर्ज, शुल्क, कागदपत्रे व यादी विभागीय मंडळाकडे जमा करणे - ३० ऑगस्ट
अर्जासाठी कागदपत्रे:
· शाळा सोडल्याचा दाखला, मूळ प्रत (नसल्यास द्वितीय प्रत व प्रतिज्ञापत्र), आधार कार्ड, स्वतःचा पासपोर्ट फोटो (ऑनलाईन अर्ज भरताना कागदपत्रे स्कॅन करण्यासाठी विद्यार्थ्यांनी स्कॅनर, मोबाईलद्वारे कागदपत्रांचे फोटो काढून ते अपलोड करावेत, या प्रक्रियेसाठी विद्यार्थ्यांचा मोबाईल क्रमांक व ईमेल आयडी संपर्कासाठी अनिवार्य आहे.
अर्ज भरल्यानंतर:
· अर्जाची प्रत विद्यार्थ्याने अर्जात नमूद केलेल्या ई-मेलवर येणार.
· अर्जाची प्रिंटआऊट, शुल्क पावती व हमीपत्र यासह दोन प्रतीत काढून घ्या.
· नमूद संपर्क शाळा, कनिष्ठ महाविद्यालयामध्ये विहित मुदतीत जमा करा.
· विहित शुल्क रोखीने संपर्क शाळा, कनिष्ठ महाविद्यालयात जमा करा.
· विद्यार्थ्यांसाठीच्या प्रतीवर स्वाक्षरी व शिक्का घेऊन तो स्वतःकडे ठेवा.
· ऑनलाईनबाबत अडचण आल्यास दू.क्र. ०२०-२५७०५२०८, २५७०५२०७, २५७०५२७१ वर संपर्क साधा.
· परीक्षेची आवेदनपत्रे मंडळाने विहित केलेल्या कालावधीत परीक्षा शुल्कासह भरणे आवश्यक.
****