Wednesday 25 January 2017



भारतीय प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा
विभागीय आयुक्त डॉ. भापकर यांच्या
 हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण

औरंगाबाद, दि. 26 : भारतीय प्रजासत्ताकाच्या 67 व्या  वर्धापन दिनानिमित्त आज पोलिस आयुक्तालय येथील देवगिरी मैदानावर  आयोजित मुख्य  शासकीय समारंभात विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर  यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले.
यावेळी महपौर बापू घडामोडे, खा. चंदकांत खैरे, आ. अतुल सावे, आ. इम्तीयाज जलील, स्वातंत्र सैनिक, विशेष पोलिस महानिरीक्षक अजित पाटील, पोलीस आयुक्त अमितेशकुमार, जिल्हाधिकारी डॉ.निधी पांडेय, पोलिस अधीक्षक नवीनचंद्र रेड्डी, जिल्हापरिषद मुख्यकार्यकारी अधिकारी मधुकर अर्दड, महानगर पलिका आयुक्त ओमप्रकाश बकोरिया,अपर आयुक्त डॉ. विजयकुमार फड, अपर जिल्हाधिकारी पी.एल. सोरमारे,विविध शासकीय विभागाचे अधिकारी उपस्थिती होते.
            शुभेच्छा संदेशात डॉ.भापकर म्हणाले, न्याय, समता, स्वातंत्र्य या लोकशाहीच्या उदात्त मुल्यांची देण देणारी आपली राज्यघटना जगातील एक आदर्श राज्यघटना ठरलेली आहे. या राज्यघटनेमुळे देशाची सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक आणि औद्योगिक या सर्व क्षेत्रात गतीमान वाटचाल सुरु आहे. देशाच्या या प्रगत वाटचालीमध्ये महाराष्ट्राचे योगदान उल्लेखनीय राहीलेले आहे, म्हणूनच महाराष्ट्र हे देशातील आघाडीचे आणि पुरोगामी राज्य ओळखले जाते. स्वच्छात अभियानेमध्ये सर्वांनी सहभाग नोंदऊन परिसर स्वच्छ ठेवण्याच्या संकल्प करु या तसेच पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी, समाजातील अज्ञान दुर करण्यासाठी  वृक्षारोपनाचा कार्यक्रम हाती  घेऊन तो यशस्वी करूण्याचा संकल्प करा असे आवाहन  त्यांनी यावेळी केले.
  देशाला स्वातंत्र मिळून देण्याऱ्या थोर व्यक्तींचे स्मरण केले पाहिजे, धर्म,जात, पंथ,क्षेत्र हा भेदभाव ना करता सर्वांनी  हातात हात घालून यशस्वीपणे वाटचाल सुरू ठेवली पाहिजे.साहित्य, संस्कृती, कला, क्रीडा, शिक्षण, शिल्पकला,नैसर्गिक साधन संपत्ती, आणि औद्यागिक या सगळ्यासह वैचांरिक चिंतनाची प्रगल्भ परंपरा लाभलेल्या महाराष्ट्राची भविष्यातही अशीच उज्वल वाटचाल होत रहावी. यासाठी आपण सगळे मिळून विकासाच्या कल्पक आणि नाविन्यपूर्ण योजना, संकल्पना राबवू या. सामाजिक सलोखा, बंधुभाव, सौहार्दपूर्ण समाजाच्या निर्मितीसाठी एकसंध भावनेतून कृतीशील होऊ, या अशी भावना डॉ.भापकर यांनी यावेळी व्यक्त केली.
कार्यक्रमाच्या सुरुवातील विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांनी परेडचे निरीक्षण करून मानवदंना स्वीकारली. त्यानंतर  जलयुक्त शिवार अभियानामध्ये  2015-16,2016-17 मध्ये उत्कृष्ट नियोजन करून अभियान यशस्वीपणे राबविल्याबद्दल तसेच स्वच्छ भारत आभियानामध्ये उत्कृष्ठ कार्यबद्दल डॉ.भापकर  यांचे हस्ते जिल्हाधिकारी डॉ.निधी पांडेय यांचा सन्मान व सत्कार  करण्यात आला.
पोलीस खात्यात निष्ठेने सेवा करणऱ्या पोलिस अधीक्षक कार्यालयातील पोलिस उपनिरीक्षक फसीयोद्दीन खान यांचा सन्मानचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. यानंतर ज्ञानदीप विद्यालय व रावसाहेब म्हस्के कनिष्ठ महाविद्यालयाच्या लेझीम  पथकांने सांस्कृतिक कार्यक्रमांचे  तर एमआयाटी विद्यालयाचे विद्यार्थांनी  दौरी मल्लखंम व  मल्लखंम  या मैदाणी खेळाचे सादरीकरण केले. सामूहिक परेडचे संचालनामध्ये पोलिस, गृह रक्षक दल, राष्ट्रीय छात्र सेना, आरएसपी स्कॅाऊट गाडी सैनिकी शाळयाच्या विद्यार्थीं, पोलिस बॅड,श्वान पथक , रस्त सुरक्षा, अग्निशामन, आरोग्य, वने, सामाजिक वनीकरण आदीविभागांचे चित्ररथ व वाहन पथक सहभागी झाले होते.