Wednesday 18 September 2019

शेती पूरक व्यवसायांना राज्य शासनाची पत हमी
मुंबई, दि. 18 अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळामार्फत देण्यात येणाऱ्या शेती पूरक व्यवसायासाठीच्या कर्जांना राज्य शासन पतहमी देणार आहे.
आतापर्यंत महामंडळाच्या योजनेचा लाभ 7 हजार 866 जणांना मिळाला असून बँकेमार्फत 400 कोटी रुपयांचे कर्ज वाटप करण्यात आले. महामंडळांकडून 3 हजार 700 लाभार्थींना 10 कोटींचा व्याज परतावा केलेला आहे. उर्वरीत लाभार्थींना व्याज परतावा देण्याचे काम सुरु आहे.
बँकामार्फत शेतीपूरक व्यवसायांकरिता कर्ज देताना अडचणी येत होत्या. त्या अडचणी दूर करण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात आले. क्रेडिट गँरटी फंड ट्रस्ट फॉर मायक्रो अँड स्मॉल इंटरप्राईजेस अंतर्गत शेतीपूरक कर्जाला पत हमी देता येते.
 शेती पूरक व्यवसायांसाठी केंद्र शासनाच्या मुद्रा योजनेच्या धर्तीवरच क्रेडिट गॅरंटी फंडस फॉर मायक्रो अँड स्मॉल एंटरप्रायजेस आणि  क्रेडिट गॅरंटी फंडस ट्रस्ट फॉर मायक्रो अँड मिडीअम इंटरप्रायजेस या दोन्ही पत हमीच्या योजना यापुढील काळात महामंडळाच्या कर्जासाठी लागू  करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महामंडळामार्फत सीजीटीएमएसई आणि सीजीएफएमयू या दोन्ही पत हमीच्या योजनांचे शुल्क बँकेत भरल्यावर त्याचा परतावा करण्यात येईल.
 या निर्णयानुसार राज्य शासनामार्फत बँकांना 25 सप्टेंबर 2018 रोजी क्रेडिट गँरटी फंड ट्रस्ट फॉर मायक्रो अँड स्मॉल इंटरप्राईजेस अंतर्गत घेतलेल्या कर्जावरील पत हमी देण्याकरिता मंजुरी देण्यात आली आहे.

Friday 13 September 2019

राज्यात ८५६ हेक्टर क्षेत्रावर ६८ वन उद्याने
-     सुधीर मुनगंटीवार
मुंबई, दि. 12 :  राज्यात ८५६.७१ हेक्टर क्षेत्रावर ६८  वन उद्यानांची निर्मिती प्रगतीपथावर असून यासाठी १३४ कोटी १४ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे अशी माहिती वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.
स्व. उत्तमराव पाटील वन उद्यान योजनेअंतर्गत प्रत्येक जिल्ह्यात २ वन उद्यानाची निर्मिती करण्यात येत आहे. यामध्ये स्थानिक प्रजातीच्या वृक्षांची लागवड करण्यात आली आहे. उद्यानांचे काम प्रगतीपथावर असले तरी ही सर्व उद्याने नागरिकांसाठी खुली आहेत. उद्यानाच्या माध्यमातून फळवनचंपकवनकदंबवनअशोकवनआम्रवनजंबुवनवंशवनमदनवृक्ष वनचरक वनलता वनसारिका वन मगृसंचार वनअतिथीवन यासारखी विविध प्रकारची उपवनेप्रिय व्यक्तीच्या नावे वृक्षारोपण करून स्मृतिवने निर्माण केली जात आहेत.
वन उद्याने
माजीवाडाकानविंदे(ठाणे)कार्लेखिंडचौल(रायगड)तेनपापडखिंड (पालघर)खाणूचिखली (रत्नागिरी)रानभाबूलीमुळदे (सिंधुदूर्ग)नऱ्हेरामलिंग (पुणे)गुरेघरपारगाव (सातारा)बोलवाडखामबेले (सांगली) कुंभारीमळोली (सोलापूर)कागलपेठ वडगाव (कोल्हापूर)पठारी (औरंगाबाद)माणकेश्वरगंगाखेड (परभणी)बोंदरवदेपुरी (नांदेड)तीर्थढोकी (उस्मानाबाद)जालना ट्रेनिंग सेंटरदहीपुरी(जालना)एसआरपीएफपोतरा (हिंगोली)नारायणगडसेलुम्बा (बीड)तांबरवाडीनागझरी (लातूर)कुडवानवाटोलामोरगावगराडा(गोंदिया)वर्धा एमआयडीसीरांजणी (वर्धा)वेण्णा (नागपूर)डोंगराला (भंडारा)चंद्रपूरगोंदेडागोंडपिंपरी (चंद्रपूर)धानोरा (गडचिरोली)पारेगावमाणिकपुंजकांदाने (नाशिक)जामखेळ (धुळे)कुंभारखोरीबिलाखेड(जळगाव)नांदुरखीआठवाड (अहमदनगर)कोथाडाहोल (नंदूरबार)उपटखेडामदलाबाद (अमरावती)वाशिम्बाकुरुमकटीबटी(अकोला)पिंपळखुटाजानुना(बुलढाणा)आंबेवनजोंधळणी (यवतमाळ)तपोवनरामनगर(वाशिम) या जैवविविधता वन उद्यानाचा यात समावेश आहे.
            शहरांमधील नागरिकांमध्ये विशेषत : विद्यार्थ्यांमध्ये वृक्षप्रजाती आणि वन्यजीवांविषयी आस्था निर्माण व्हावीत्यांचे या गोष्टींकडे लक्ष आकर्षित व्हावे यासाठी त्यांना या उद्यानात अभ्यासाबरोबर क्रीडा-व्यायाम आणि मनोरंजनाची साधने उपलब्ध करून दिली जात आहेत. वृक्ष-लतांचे महत्व आणि उपयोगिता सांगणारे पुस्तक संग्रहालय निर्माण करण्याचे व त्याद्वारे या सर्व माहितीचा प्रचार आणि प्रसार करण्याचेही यात नियोजित आहे.
०००००
महिला बचत गटांना २०० कोटी रुपयांचे खेळते भांडवल

मुंबई, दि. १3 :- राज्य शासनाने महिला बचत गटांना २०० कोटी रुपयांचे खेळते भांडवल दिले आहे. यामुळे बचत गटांमार्फत स्वयंरोजगारासाठी सुरु करण्यात आलेल्या विविध उपक्रमांना मोठ्याप्रमाणावर सहाय्य झाले आहे.
या बचत गटांच्या मार्फत महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हाव्यात यासाठी राज्यात गेल्या पाच वर्षात विशेष प्रयत्न करण्यात आले. त्याचाच एक भाग म्हणून बचत गटातील १ लाख १४ हजार महिलांना विविध कौशल्यांचे प्रशिक्षणही देण्यात आले.
बचत गटाच्या उपक्रमांना प्रोत्साहन देण्यावर विशेष भर देण्यात आल्याने २०१४ नंतर ३ लाख ९७ हजार १३७ बचतगटांची निर्मिती झाली. यातील लाभार्थी कुटुंबांची संख्या ३२ लाख ८६ हजार १४६ इतकी आहे. याच कालावधीत २६ हजार ४६५ समूह गट आणि ६८८८ ग्रामसंघाची स्थापना करण्यात आली.
0000

गाळमुक्त धरणाची प्रभावी अंमलबजावणी
९ कोटी ६४ लाख घनमिटर गाळ निघाला

मुंबई, दि १3 :- गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीमुळे राज्यात ९ कोटी ६४ लाख घनमिटर गाळ काढण्यात यश आले आहे. यामुळे ५२७० धरणे स्वच्छ झाली आहेत.
मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांनी गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त धोरणाच्या अंमलबजावणीवर विशेष लक्ष केंद्रित केले आहे. धरणात गाळ सतत साचत राहिल्याने त्यांच्या पाणी साठ्याच्या क्षमतेवरही परिणाम झाला होता. २०१४ पासून या योजनेला गती देण्यात आली.
धरणातील गाळ काढण्याच्या या उपक्रमामुळे ४७ दशलक्ष घनमीटर पाणी साठ्यात वाढ झाली आहे. हा गाळ शेतकऱ्यांना मोफत देण्यात आला असून त्यामुळे १.२५ लाख हेक्टर शेतजमिनीच्या सुपिकतेत वाढ झाल्याचे निदर्शनास आले आहे.
00000

Friday 6 September 2019


पुस्तकांच्या गावात 30 हजार पुस्तक;
दीड लाख वाचक प्रेमींची भेट!

मुंबई, दि. 6: भारतातील पहिले 'पुस्तकांचे गाव' अशी ओळख असलेल्या सातारा जिल्ह्यातील  भिलार या पुस्तकांच्या गावात गेल्या दोन वर्षात दीड लाखांहून अधिक वाचक पर्यटकांनी भेट दिली आहे. या गावात वाचक पर्यटकांसाठी 30 हजारहून अधिक पुस्तकांचा खजिना उपलब्ध करुन देण्यात आला आहे.
वाचनसंस्कृती जोपासण्यासाठी सुरु करण्यात आलेला'पुस्तकांचे गाव' हा उपक्रम आता नियमित योजना स्वरुपात रुपांतरित करण्याचा निर्णय नुकताच घेण्यात आला आहे. त्यामुळे वाचक-पर्यटकांना याठिकाणी आणखी सुविधा उपलब्ध होतील.
भिलार येथे 4 मे 2017 पासून 'पुस्तकांचे गाव' हा उपक्रम राबविण्यात येत आहे. आतापर्यंत या गावात 13 साहित्यिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.या ठिकाणी वाचकांसाठी दर्जेदार इंग्रजी पुस्तकेही उपलब्ध करुन देण्यात आली आहेत. गेल्या २ वर्षांत गावकऱ्यांच्या आग्रहामुळे एकूण १० पुस्तक घरांचा या प्रकल्पात नव्याने समावेश करण्यात आला आहे.
शासनाचा पुढाकार आणि लोकसहभाग याचे ‘पुस्तकाचे गाव’ हेउत्कृष्ट उदाहरण आहे. पुस्तके ठेवण्यासाठीची जागा घरमालक, ग्रामपंचायत व शाळा व्यवस्थापन यांच्याकडून विनामोबदला देण्यात आली आहे. गावातील राहती घरे, निवारागृहे, शाळा व मंदिरे अशा 35 ठिकाणी विविध साहित्यप्रकारांची पुस्तके उपलब्ध करुन देण्यात आली आहेत.
इंग्लडमधील 'हे ऑन वे'च्या धर्तीवर भारतातील हे पहिले पुस्तकांचे गाव विकसित करण्यात आले आहे. या गावात येणारे पर्यटक कोणतेही पुस्तक विनामूल्य वाचू शकतात.
००००