Thursday 8 August 2019

भारतीय स्वातंत्र्य दिन समारंभाच्या 
पूर्वतयारीचा आढावा
         औरंगाबाद,दि.08  - भारतीय स्वातंत्र्य दिन समारंभाच्या पूर्वतयारीची आढावा बैठक अपर जिल्हाधिकारी भानुदास पालवे यांच्या अध्यक्षतेखाली  जिल्हाधिकारी कार्यालयात झाली .
          ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय समारंभ विभागीय आयुक्त कार्यालयाच्या प्रांगणात होणार असून 15 ऑगस्ट 2019 रोजी सकाळी 9 वाजून 5मिनीटास ध्वजारोहण होईलत्यामुळे  15 ऑगस्ट 2019 रोजी  सकाळी 8.35 ते 9.35 या कालावधीत इतर ठिकाणी ध्वजारोहणाचा कोणताही शासकीय किंवा अर्धशासकीय समारंभ आयोजित करण्यात येवू नयेकार्यालय किंवा संस्थेने आपला स्वत:चा ध्वजारोहण समारंभ सकाळी 8.35 वाजेच्या पूर्वी व9.35 वाजेनंतर साजरा करावाअसे श्री.पालवे यांनी सूचित केले.
          सामुदायिक राष्ट्रीय गीत गायनाचा अंतर्भाव असलेले खास कार्यक्रम शाळा व महाविद्यालयात आयोजित करण्यात यावेतसामाजिक न्याय विभागातर्फे सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करावेशासकीय इमारतींवर रोषनाई करावीअसे यावेळी आदेशित करण्यात आले.
          कार्यक्रम यशस्विरित्या पार पाडण्याच्या दृष्टीने कार्यक्रमस्थळी पोलीसांनी कडेकोट सुरक्षा बंदोबस्त ठेवावामुख्य शासकीय ध्वजारोहण आनंदात पार पाडण्यासाठी पोलीसमहानगरपालिकाबांधकाम विभागक्रीडा विभागविद्युत वितरण कंपनीसामाजिक वनीकरण विभागमहसूल विभागएन.सीसीग्रुप इतर सर्व संबंधितांनी सक्रिय सहकार्य करावेअसे आवाहन  अपर जिल्हाधिकारी भानुदास पालवे यांनी यावेळी केलेबैठकीस सर्व संबंधित उपस्थित होते.
*******
                                            बकरी ईद निमित्त तात्पुरत्या
स्वरुपात कत्तलखान्यांना परवानगी
                   औरंगाबाद, दि.08 – औरंगाबाद महानगरपालिका आयुक्त यांनी मुंबई प्रांतिक महानगरपालिका अधिनियम 1949 चे कलम331 (1)(2) 378 (1 )(चार अन्वये घोषित   महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायदा 1976 अन्वये (सुधारीत) 1995 अन्वये फक्त शेळीमेंढी व म्हैस वर्गीय जनावरांची कुर्बानी करण्याकरीता बकरी ईद या सणानिमित्त  शहरात दि. 11 ऑगस्ट रविवार रोजी सराफा येथे बोहरा समाज मोहल्ला जबिहाट दाऊदी बोहरा जमात ऑफिस समोरसराफापानदरीबाऔरंगाबाद, 12 ऑगस्टसोमवार रोजी रोजा बाग येथे शम्स तरबेज  बाबा दर्गासंरक्षित भिंतीच्या आत,सिल्लेखाना येथे जुना कत्तलखाना (पश्चिम बाजू), संरक्षित भिंतीच्या आतचिकलठाणा येथे शेरहिम शेमोहंमद यांचा वाडाघर क्र. 735, संरक्षित भिंतीच्या आत या ठिकाणी तात्पुरत्या स्वरुपात सकाळी 8 ते  दुपारी 2 वाजेपर्यंत कत्तलखाना चालविण्यास परवानगी देण्यात येत आहेपडेगाव येथे मनपा पडेगाव कत्तलखाना,  शहाबाजार येथे मनपा शहाबाजार कत्तलखाना नियमित चालू राहील.
                   सदरील परवानगी ही अगदी तात्पुरत्या स्वरुपात असून ती वेळेपुरती मर्यादित आहेकोणीही उघड्यावर किंवा केंद्राशिवाय इतर ठिकाणी जनावरांची कत्तल करु नयेमांस वाहतूक उघड्यावर करु नये कत्तलखान्यांची परवानगी ही तात्पुरत्या स्वरुपाची असली तरी नियमितपणे चालविण्याच्या कत्तलखान्याचे  सर्व नियम , अटी व शर्ती देखील लागू राहतीलअसे मनपा आयुक्त डॉनिपुण विनायक यांनी आदेशात म्हटले आहे.  
*******
                           औरंगाबाद पोलीस आयुक्तालय हद्दीत कलम 144 
  औरंगाबाद,दि.08  - औरंगाबाद पोलीस आयुक्तालय हद्दीतील परिसरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी  फौजदारी प्रक्रिया संहिता सन 1973 चे कलम 144 (1)  (3) अन्वये मनाई आदेश जारी केले आहेतसदरील आदेश दिनांक 22 ऑगस्टपर्यंत अंमलात राहतील,असे पोलीस उप-आयुक्तमुख्यालय औरंगाबाद शहर यांनी कळविले आहे.
*******
                                  महाराष्ट्र सार्वजनिक ग्रंथालये अधिनियमात
कालानुरूप सुधारणा करण्याबाबत आवाहन
          औरंगाबाद,दि.08  महाराष्ट्र सार्वजनिक ग्रंथालये अधिनियमात कालानुरूप सुधारणा करण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे.प्रस्तावित अधिनियम व नियमात सुधारणा,बदल सूचविताना त्याचे बाब निहाय सकारण व योग्य समर्थन करणे आवश्यक आहे तसेच सुधारणा,अभिप्राय,मतसूचना इ. विषयक पत्रव्यवहार समक्षटपालई-मेलद्वारे ग्रंथालय,संचालनायाच्या धिपत्याखालील जिल्ह्याच्या ठिकाणी कार्यरत असलेल्या जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयांना दि.३१ऑगस्टपर्यंत सादर कराव्यात.   याबाबतचा संपूर्ण तपशील ग्रंथालय संचालनायाच्याwww.dol.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून दिला असल्याचे संचालनालयाचे सुभाष राठोड यांनी कळविले आहे.
          या संदर्भात ग्रंथालय चळवळीशी संबंधित लेखक, साहित्यिक,वृत्तपत्र संपादक,मुद्रक प्रकाशक, ग्रंथ विक्रेते,शासनमान्य सार्वजनिक ग्रंथलायांचे पदाधिकारी,कार्यकर्ते सेवक,वाचक व सभासद , शैक्षणिक ग्रंथपाल,ग्रंथालय व्यावसायिक,संस्था,लोकप्रतिनिधी,माहिला,महाविद्यालयविद्यापीठीय ग्रंथालय व माहिती शास्त्राचे प्राध्यापक, संचालनायातील अधिकारी व कर्मचारी वर्ग आदींनी पुढाकार घ्यावाअसेही त्यांनी म्हटले आहे.
महाराष्ट्र सार्वजनिक ग्रंथालये अधिनियम,१९६७ व त्याच्या अंमलबजावणीसाठी तयार करण्यात आलेले नियम महाराष्ट्र सार्वजनिक ग्रंथालये (सहाय्यक अनुदान आणि इमारत व साधनसामग्री अनुदाने यासाठी मान्यता) नियम,१९७०महाराष्ट्र सार्वजनिक ग्रंथालय संघ (सहाय्यक अनुदानासाठी मान्यता देणे) नियम १९७१महाराष्ट्र सार्वजनिक ग्रंथालये, राज्य ग्रंथालय परिषद व जिल्हा ग्रंथालय समित्या (कामकाजाची कार्यपद्धती) नियम,१९७३,महाराष्ट्र ग्रंथालयांना (संशोधन व साहित्यिक परीसंस्थाची ग्रंथालये) सहायक अनुदानाकरिता मान्यता देण्याचे नियम,१९७४ यामध्ये कालानुरूप सुधारणा करण्याचा शासनाने निर्णय घेतला आहेअसेही त्यांनी कळविले आहे.
*******
                                        विशेष पोलीस महानिरीक्षकांकडून
जनतेसाठी हेल्प लाईन सेवा
          औरंगाबाद,दि.08 - औरंगाबाद परिक्षेत्रातील औरंगाबाद ग्रामीण, जालना, बीड व उस्मानाबाद जिल्ह्यातील पोलीस अधीक्षक कार्यालय, उप-विभागीय पोलीस अधिकारी कार्यालय तसेच पोलीस ठाणे येथे सर्व सामान्य जनतेच्या तक्रारींचे निरसन होत नसल्यास अथवा त्यांच्या तक्रारींची वेळीच दाखल न घेतल्यास त्यांना औरंगाबाद येथील विशेष पोलीस महानिरीक्षक कार्यालय येथे तक्रार देण्यासाठी यावे लागत होते. याबाबत औरंगाबाद परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ.रवींद्र कुमार सिंगल यांनी दखल घेत सर्व सामान्य जनतेच्या सोयीसाठी विशेष हेल्प लाईन ७३५०३२८८८८ क्रमांकाची सेवा सुरु केली आहे.
परिक्षेत्रातील जिल्ह्यामधील पोलीस ठाणे स्तरावर ,उपविभागीय पोलीस अधिकारी किंवा पोलीस अधीक्षक स्तरावर सर्व सामान्य जनतेच्या तक्रारींचे निरसण होत नसल्यास अथवा त्यांच्या तक्रारीची दखल घेतली जात नसल्यास त्यांनी आमचे हेल्प लाईन क्र७३५०३२८८८८ वर संपर्क साधून त्यांच्या तक्रारीबाबत माहित द्यावी. त्यांच्या तक्रारीच्या अनुषंगाने संबधितांचा पाठपुरावा करून तक्रारीचे निरसन करण्यात येईल. तरी जनतेने हेल्प लाईन क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन विशेष  पोलीस महानिरीक्षक डॉ.रवींद्र कुमार सिंगल यांनी केले आहे.
******

आऊट ऑफ टर्न परीक्षेला मुदत वाढ
औरंगाबाद,दि.08 – उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा जुलै-ऑगस्ट २०१९ च्या आउट ऑफ टर्न परीक्षेचा अंतिम मुदत ०५ ऑगस्ट होता. परंतु राज्यातील नैसर्गिक आपत्ती पूरपरिस्थिती विचारात घेता मुदतीत वाढ करण्यात आलेली आहे.  तेव्हा आऊट ऑफ टर्न परीक्षा वाढीव दिनांक १० ऑगस्टपर्यंत घेण्यात येईल, याची मंडळ कार्यकक्षेतील  कनिष्ठ महाविद्यायालयांच्या प्राचार्यांसह संबधितानी नोंद घ्यावीअसे माध्यमिक व व उच्च माध्यमिक मंडळाच्या विभागीय सचिवांनी कळविले आहे.                                                              ******

महाराष्ट्र महसूल न्यायाधिकरणाचे
अध्यक्ष न्याचांदीवाल यांचा दौरा
औरंगाबाद,दि.08 –महाराष्‍ट्र महसूल न्यायाधिकरण मुंबईचे अध्यक्ष के.यू. चांदीवाल औरंगाबादजिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा औरंगाबाद जिल्हा दौरा दिनांक 13, 14 व  16 ऑगस्ट आणि एक सप्टेंबर ते 15 सप्टेंबर 2019 असा निश्चित झाला आहेया  कालावधीत न्यायाधिकरणातील प्रकरणांमध्ये ते सुनावणी घेणार आहेतअसे उपप्रबंधकमहाराष्ट्र महसूल न्यायाधिकरणऔरंगाबाद यांनी  कळविले आहे.                                                            *****

साठे महामंडळात अण्णाभाऊ साठे जयंती साजरी
     औरंगाबाद,दि.08 –साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती व जन्म शताब्दी महोत्सवाचा कार्यक्रम दिनांक 1 ऑगस्ट  रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथील सभागृह येथे उत्साहात पार पडला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी (अप्पर जिल्हाधिकारी) तथा अध्यक्ष जिल्हा जात पडताळणी समिती औरंगाबाद महेंद्र हरपाळकर हे होते. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा अग्रणी बँकेचे अधिकारी आनंद आर.जोशी, सहाय्यक आयुक्त सामाजिक न्याय विभागाचे एस .एस. शेळके,साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाचे प्रादेशिक व्यवस्थापक अनिल रा.म्हस्के, संत रोहिदास महामंडळाचे विभागीय अधिकारी,हिरालाल गतखणे,व महात्मा फुले विकास महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक, दत्ता मोहिते, वसंतराव नाईक विकास महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापकडी .ए.सांगळे उपस्थित होते. तसेच अण्णाभाऊ साठे यांच्या जीवन व कार्य या विषयावर डॉ.बाबासाहेब आंबेडकर कला व वाणिज्य महाविद्यालय औरंगाबाद प्रा.डॉ.सुरेश चौथाईवाले (साहित्यिक) हे प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते. चौथाईवाले यांनी अण्णाभाऊच्या जीवनावर प्रकाश टाकला. अण्णाभाऊ हे त्यांच्या वाटेगाव येथे जन्म झाल्यापासून पुढील त्यांच्या संपूर्ण आयुष्यामध्ये त्यांनी भोगलेल्या वेदना,त्रास तसेच त्यांनी लिहिलेल्या कादंबऱ्या, कथासंग्रह , पोवाडे ,लोकगीते इत्यादीवर उपस्थितांना मार्गदर्शन केले. अर्जुन रसाळ व अतिरिक्त जिल्हाधिकारी महेंद्र हरपाकर यांनी सुद्धा अण्णाभाऊंच्या जीवनावर उपस्थितांना मार्गदर्शन केले.
     कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कार्यक्रमाचे संयोजक के.बी.पवार, जिल्हा व्यवस्थापक, औरंगाबाद यांनी प्रास्ताविक केले व श्रीमती उषा सोनोने,कार्यालयीन सहाय्यक यांनी सूत्रसंचालन व आभार व्यक्त केले. जयंती कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी एस.एस.गायकवाड, भानूदास नजन, श्री.गणेश काळोखे , कुंदन शेलार यांनी पुढाकार घेतला.
******

मराठवाड्यात चांगल्या पावसाची प्रतिक्षा
नांदेड जिल्ह्यात पावसाचे आगमन, विभागात 286.मि.मी. पाऊस

 औरंगाबाद, दि. 8 (विमाका) मराठवाडयात ढगाळ वातावरण असले तरी अद्याप पावसाचा जोर नाही. विभागात आतापर्यंत केवळ 286.30 मि.मी पाऊस झाला आहे. वार्षिक सरासरीच्या तुलनेत 36.8 टक्के पाऊस झाला आहे. आज सकाळी मागील चोवीस तासांत नांदेड, परभणी, औरंगाबाद जिल्ह्यात चांगला पाऊस झाला नांदेड जिल्ह्याच्या कंधार तालुक्यातील कंधार सर्कलमध्ये 71.00 मि.मी. कुराला सर्कलमध्ये 66.00मि.मी. पेठवडज सर्कलमध्ये 87.00 मि.मी , फुलवळ सर्कलमध्ये 65.00 मि.मी. लोहा तालुक्यातील सोनखेड सर्कलमध्ये 72.00 मि.मी, बिलोली तालुक्यातील आदमपूर सर्कलमध्ये 68.00 मि.मी. सगरोळी सर्कलमध्ये 72.00 मि.मी, मुखेड तालुक्यातील मुखेड सर्कलमध्ये 68.00 मि.मी. आणि  चांडोळा सर्कलमध्ये 90.00 मि.मी. पाऊस झाला.
 जिल्हानिहाय  आजपर्यंत झालेल्या पावसाची आकडेवारी पुढील प्रमाणे आहे. औरंगाबाद- 299.10 मि.मी, जालना -257.27  मि.मी, परभणी -266.85 मि.मी, हिंगोली - 371.65 मि.मी, नांदेड 447.05 मि.मी, बीड 156.96 मि.मी. लातूर 251.16 मि.मी, आणि उस्मानाबाद 240.33 मि.मी.
आज सकाळी मागील चोवीस तासांतील पाऊस व कंसात आजपर्यंत झालेला पाऊस याची तालुकानिहाय आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे. सर्व आकडेवारी मिलीमीटर परिमाणात आहे.
औरंगाबाद जिल्हा- औरंगाबाद 6.90 (259.50), फुलंब्री 6.00 (318.25), पैठण 5.30 (195.83), सिल्लोड 17.38 (402.31), सोयगाव 27.00 (451.33), वैजापूर 4.80 (255.10), गंगापूर 5.44 (232.11), कन्नड 7.88 (316.50), खुलताबाद 16.00 (261.00). जिल्ह्यात एकूण 299.10 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.
जालना जिल्हा- जालना 3.00 (205.19), बदनापूर 2.80 (245.80), भोकरदन 11.63 (366.38), जाफ्राबाद 8.40 (297.20), परतूर 19.64 (240.26), मंठा 4.50 (264.75), अंबड 12.43 (225.86), घनसावंगी 13.86 (212.71), जिल्ह्यात एकूण 257.27 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.
परभणी जिल्हा- परभणी 14.00 (238.80), पालम 35.33 (245.33), पूर्णा 22.80 (346.80), गंगाखेड 32.50 (265.00), सोनपेठ 25.00 (265.00), सेलू 22.60 (225.20), पाथरी 20.33 (238.33), जिंतूर 6.00 (265.17), मानवत 25.67 (312.00), जिल्ह्यात एकूण पावसाची नोंद 266.85 मि.मी. झाली आहे.
हिंगोली जिल्हा- हिंगोली 9.14 (346.71), कळमनुरी 10.50 (466.25), सेनगाव 12.00 (343.67), वसमत 9.71 (258.86), औंढा नागनाथ 5.50 (442.75). जिल्ह्यात एकूण 371.65 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.
नांदेड जिल्हा- नांदेड 20.38 (419.00), मुदखेड 24.00 (491.33), अर्धापूर 9.67 (386.99), भोकर 9.75 (464.00), उमरी 32.67 (431.46), कंधार 65.00 (415.16), लोहा 53.00 (365.48), किनवट 17.00 (604.33), माहूर 16.50 (599.44), हदगाव 7.43 (431.14), हिमायत नगर 3.67 (505.99), देगलूर 30.50 (289.00), बिलोली 56.80 (494.80), धर्माबाद 30.67 (439.67), नायगाव 44.20 (433.20), मुखेड 48.71 (381.86), जिल्ह्यात एकूण 447.05 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.
बीड जिल्हा- बीड 3.45 (140.82), पाटोदा 0.00 (176.00), आष्टी 0.14 (160.86), गेवराई 12.10 (123.40), शिरुर कासार 0.00 (104.00), वडवणी 18.00 (154.50), अंबाजोगाई 0.40 (146.80), माजलगाव 25.33 (225.03), केज 0.00 (148.57), धारुर 4.00 (138.67), परळी 18.00 (207.87), जिल्ह्यात एकूण 156.96 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.
लातूर जिल्हा- लातूर 1.00 (159.50), औसा 0.43 (163.29), रेणापूर 1.75 (202.25), उदगीर 3.14 (258.43), अहमदपूर 26.83 (378.00), चाकुर 3.80 (217.80), जळकोट 21.50 (353.50), निलंगा 7.75 (264.00), देवणी 2.67 (270.50), शिरुर अनंतपाळ 4.67 (244.33), जिल्ह्यात एकूण 251.16 मि.मी. पाऊस झाला आहे.
उस्मानाबाद जिल्हा- उस्मानाबाद 2.25 (222.75), तुळजापूर 19.00 (325.29), उमरगा 21.60 (332.80), लोहारा 25.33 (322.33), कळंब 1.50 (169.83), भूम 4.60 (215.90), वाशी 3.67 (199.33), परंडा 1.40 (134.40), जिल्ह्यात एकूण 240.33 मि.मी. पाऊस झाला आहे.
******

महाराष्ट्राने दिला देशाला सर्वाधिक जीएसटी महसूल
१५ टक्क्यांच्या हिश्श्यासह देशात अग्रस्थानी
- सुधीर मुनगंटीवार

मुंबई, दि. ८ : देशपातळीवरील जीसएटीच्या महसूल संकलनात महाराष्ट्राने १५ टक्के हिस्सा नोंदवला असून देशात महाराष्ट्र यामध्ये अग्रस्थानी असल्याची माहिती वित्त व नियोजनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.
देशात सन २०१८-१९ मध्ये जीएसटी करापोटी जो महसूल जमा झाला त्यातील १.७० लाख कोटी रुपयांचे महसूल संकलन एकट्या महाराष्ट्रातून झाले आहे. जे त्या आधीच्या वर्षाच्या तुलनेत ( २०१७-१८)  ८ टक्क्यांनी अधिक आहे.
महाराष्ट्राने नेहमीच देशाच्या आर्थिक प्रगतीचा वेग वाढवण्यामध्ये आपला यशस्वी सहभाग नोंदवल्याने पंधराव्या वित्त आयोगाच्या अध्यक्षांनी महाराष्ट्राला देशाचे ग्रोथ इंजिन असे संबोधले होते अशी माहिती देऊन श्री. मुनगंटीवार म्हणाले कीराज्यात वस्तू आणि सेवा कर प्रणाली आता स्थिरावली आहे. करसुलभताव्यवसायवृद्धी आणि महसूलात वाढ या तिहेरी लाभातून ही कर प्रणाली राज्यात सुदृढ होत आहे. देशपातळीवरील योगदानाबरोबर महाराष्ट्राला या कर प्रणालीचा फायदा होतांना दिसत आहे. राज्यात वित्तविमा आणि बँकिंग क्षेत्रातील सेवांचा सर्वात मोठा ग्राहक आहे.  त्यांचे दरडोई उत्पन्न इतर राज्यांच्या तुलनेने जास्त आहे. याचा सुपरिणाम करसंकलनात होतांना दिसत आहे. त्यामुळेच राज्याचे जीएसटी उत्पन्न १.२९ लाख कोटी रुपयांपर्यंत पोहोचले आहेही वाढ जवळपास १२. ९३ टक्के आहे.
कराच्या दरात कपात आणि खरेदीवर भरलेल्या कराच्या रकमेची वजावट हा दुहेरी फायदा उद्योग व्यवसायांना मिळत असल्याने  वस्तुंच्या किंमती कमी होऊन ग्राहकांनाही लाभ देणारी ही करप्रणाली आहे असे श्री. मुनगंटीवार यांनी स्पष्ट केले.  ते पुढे म्हणाले कीप्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी देशाची अर्थव्यवस्था ५ ट्रिलियन डॉलर करण्याचा संकल्प केला आहे. महाराष्ट्र या संकल्पाचा भक्कम आधार बनणार आहे. सध्या सकल राष्ट्रीय उत्पन्नात महाराष्ट्राचे योगदान १५ टक्के आहे. देशाची अर्थव्यवस्था ५ ट्रिलियन डॉलर करावयाची असेल तर महाराष्ट्राची अर्थव्यवस्था १ ट्रिलियन डॉलरने विकसित व्हायला हवी. सकल राष्ट्रीय उत्पन्नातील १५ टक्क्यांचे योगदान वाढून ते २० टक्के व्हायला हवे. यासाठी वस्तू आणि सेवा कर प्रणालीची अंमलबजावणी अधिक लोकाभिमूख आणि प्रभावीपणे होणे गरजेचे आहे. महाराष्ट्राने यात पुढाकार घेतला असून ही कर प्रणाली अधिक सुटसुटीत आणि सुविधाजनक केल्याने राज्यातील करजाळे व्यापक होण्यास ही मदत झाली आहे. राज्यात नोंदणीकृत व्यापाऱ्यांची संख्या ७ लाख ७९ हजाराहून १५ लाख ६४ हजारापर्यंत पोहोचली आहे. हे त्याचेच फलित असल्याचे श्री. मुनगंटीवार यांनी सांगितले.
००००
सूक्ष्म सिंचन योजनेमुळे 11 लाख शेतकऱ्यांचा
आर्थिक स्तर उंचावण्यास मदत
 नोंदणी ते अनुदान ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर

            मुंबईदि. 8 : राज्यात गेल्या पाच वर्षात सूक्ष्म सिंचन योजना प्रभावी आणि पारदर्शकपणे राबविल्याने सुमारे 11 लाख शेतकऱ्यांचा आर्थिक स्तर उंचावण्यास मदत झाली आहे. त्याबरोबरच सुमारे  9 लाख हेक्टर क्षेत्र सूक्ष्म सिंचनाखाली आले आहे. अशी माहिती कृषीमंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी आज दिली.
            सूक्ष्म सिंचन योजना अधिकाधिक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचावी आणि त्यांचा सहभाग त्यात वाढावा यासाठी गेल्या पाच वर्षात विविध उपाययोजना करण्यात आल्या. त्यामध्ये शेतकऱ्यांनी या योजनेसाठी अर्ज करताना सोबत जोडण्यात येणाऱ्या कागदपत्रांची संख्या 24 वरुन 9 वर करण्यात आली. यामुळे प्रशासकीय गतीमानता येतानाच अर्ज मंजुरीचे प्रमाण वाढले आहे.
            कृषी विभागाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना डिजिटल प्लॅटफॉर्मवर आणण्यासाठी पुढाकार घेण्यात आला आहे. त्याचाच एक भाग म्हणून या योजनेकरीता अर्ज स्वीकृतीसाठी ई-ठिबक’ हे सॉफ्टवेअर तयार करण्यात आले आहे. योजनेसाठी ऑनलाईन नोंदणीची सुविधा करण्यात आली आहे. त्यामुळे‘नोंदणी ते अनुदान’ वितरणाची संपूर्ण कार्यवाही संगणकीय प्रणालीद्वारे होत आहे. या योजनेच्या प्रत्येक टप्प्यावरील कार्यवाहीबाबत लाभार्थी शेतकऱ्याच्या मोबाइलवर एसएमएसद्वारे माहिती कळविली जाते. त्यामुळे योजनेच्या अंमलबजावणीत अधिक पारदर्शकता आली आहेअसे कृषीमंत्र्यांनी सांगितले.
            या योजनेच्या पूर्व संमतीचा 30 दिवसांचा कालावधी संपल्यानंतर देखील नव्याने अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. 2014 पासून सुमारे 9 लाख हेक्टर क्षेत्रावर सूक्ष्म सिंचन संचांची उभारणी केल्याने सुमारे 11 लाख शेतकऱ्यांचा आर्थिक स्तर उंचावण्यास मदत झाली आहे. मराठवाड्यातील 8 जिल्ह्यांकरीता 3 वर्षांच्या कालावधीसाठी अतिरिक्त 337 कोटी रुपये राज्य योजनेद्वारे मंजूर केल्याचे डॉ.बोंडे यांनी सांगितले.
000