विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे
यांचा दौरा
औरंगाबाद,दि.1(जिमाका)----विधानसभा
अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांचा औरंगाबाद दौरा
कार्यक्रम पुढीलप्रमणे राहील.
गुरुवार, दि. 1 डिसेंबर रोजी सकाळी 8-00
वा. मोटारने उस्मानपूरा, औरंगाबाद येथून कमालपूर, ता. श्रीरामपूर जि. अहमदनगरकडे
प्रयाण. दु. सोयीनुसार मोटारने शिर्डी, ता. राहता, जि. अहमदनगर येथून उस्मानपूरा,
औरंगाबादकडे प्रयाण. उस्मानपूरा, औरंगाबाद येथे आगमन व राखीव. मुक्काम औरंगाबाद.
शुक्रवार, दि. 2 डिसेंबर रोजी सकाळी
10-00 वा. सिमेंट बंधारा भूमीपुजन समारंभ, स्थळ - वानेगाव, ता. फुलंब्री, जि.
औरंगाबाद. सायं. 6-00 वा. कॉस्मो ई. एन.टी. हॉस्पिटलचा उद्घाटन समारंभ, स्थळ -
प्लॉट नं. 536, कामगार चौक, एन-3, सिडको, औरंगाबाद. मुक्काम औरंगाबाद.
शनिवार, दि. 3 डिसेंबर रोजी सकाळी
राखीव. सायं. 4-40 वा. मोटारने औरंगाबाद येथून चिकलठाणा विमानतळ, औरंगाबादकडे
प्रयाण. सायं. 5-00 वा. चिकलठाणा विमानतळ, औरंगाबाद येथे आगमन व राखीव. सायं. 6-00
वा. चिकलठाणा विमानतळ, औरंगाबाद येथून विमानाने मुंबईकडे प्रयाण.