Monday 5 December 2016



खादी ग्रामउद्योगाच्या प्रदर्शनाचे विभागीय
आयुक्त कार्यालयात  उद्घाटन
            औरंगाबाद, दि. 5 :खादी ग्राम उद्योग विभागाच्यावतीने विभागीय आयुक्त  कार्यालयाच्या परिसरात आयोजित प्रदर्शनाचे उद्घाटन विभागीय आयुक्त  डॉ. उमाकांत दांगट यांच्य हस्ते आज येथे करण्यात आले.
            यावेळी खादी ग्राम उद्योग  (मुंबई) चे मुख्य कार्यकारी अधिकारी रिचा बागला, अपर आयुक्त गोविंद बोडखे, उपायुक्त पारस बोथरा, उपजिल्हाधिकारी शिवाजी शिंदे, जिल्हा समिती औरंगाबादचे अध्यक्ष संतोष माने पाटील आदीची उपस्थिती होती.
खादी वापराला प्रोत्साहन मिळण्यासाठी हे प्रदर्शन आयोजित करण्यात आले असून दि. 5 डिसेंबर ते 7 डिसेंबर दरम्यान प्रदर्शन सर्वांसाठी खुले असणार आहे, तरी या प्रदर्शनाचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हा ग्राम उद्योग अधिकारी राजकुमार डांगर यांनी केले आहे.


Saturday 3 December 2016



छत्रपती शिवाजी महाराज पुरान वस्तू संग्रहालयात
 नवव्या हेरिटेज वॉकचे आयोजन
            औरंगाबाद, दि. 3 : येथील श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज पुरान वस्तू संग्रहालयात औरंगाबाद पर्यटन प्रतिष्ठाणच्या वतीने आज  सकाळी 7 वाजता नवव्या हरिटेज वॉकचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी जिल्हाधिकारी डॉ. निधी पांडेय, अपर जिल्हाधिकारी पी.एल.सोरमारे, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे प्रादेशिक व्यवस्थापक अण्णासाहेब शिंदे, जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी वासुदेव सोळंखे, आदी मान्यवर उपस्थित होते.
            यावेळी छत्रपती शिवाजी महाराज पुरान वस्तू संग्रहालया संदर्भात डॉ. सर्वेश नांद्रेकर यांनी संपुर्ण माहिती उपस्थितांना दिली . या मध्ये शिवरायांची युध्दनीती, मराठकालीन जनजीवन, पुरातन नाणे , मराठे सरदार उदय, सातवाहन दालन, तसेच वस्तू संग्रालय परिसराची माहिती दिली. 
ऐतिहासिक औरंगाबाद परीसराची जडणघडण, उभारणी तसेच विविध कला व संस्कृतीचा विकास इत्यादी ऐतिहासिक ठेवा या बाबतची माहिती सर्वांना असावी व यातून औरंगाबाद ऐतिहासिक, सांस्कृतिक पौराणिक महत्व सर्वांना कळावे या उद्देशाने ‘‘ औरंगाबाद पर्यटन प्रतिष्ठाणच्या ’’ वतीने ‘‘ऑगस्ट महिन्या पासून प्रत्येक महिन्याच्या पहिला व तिसरा शनिवार या दिवशी सकाळी 7 ते 9 वाजेपर्यंत हेरिटेज वॉक ’’ उपक्रम सुरु करण्यात आला आहे. पहिला हेरीटेज वॉक सोनेरी महल पासून सुरू करण्यात आला असून दुसरा हेरीटेज वॉक नौखंडा पॅलेस, तिसरा हेरीटेज वॉक सिध्दार्थ उद्यान, चौथा हेरीटेज वॉक हिमायत बाग व दिल्ली गेट, पाचवा हेरीटेज वॉक औरंगाबाद लेणी, सहावा हेरीटेज वॉक सलीम अली सरोवर, सातवा हेरीटेज वॉक नहर-ए- अंबरी येथे आयोजित करण्यात आला होता. या हेरीटेज वॉकला नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद मिळालेला आहे.
            यापुढील हेरिटेज वॉक दिनांक 17 डिसेंबर 2016 रोजी सकाळी 7 वाजता गुलशन महल येथे आयेजित करण्यात आलेले आहे. आजच्या हेरिटेज वॉकला पर्यटन प्रेमी, अभ्यासक, परिसरातील नागरिक उपस्थित होते.




Wednesday 30 November 2016



विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे
यांचा दौरा
            औरंगाबाद,दि.1(जिमाका)----विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे  यांचा औरंगाबाद दौरा कार्यक्रम पुढीलप्रमणे राहील.
            गुरुवार, दि. 1 डिसेंबर रोजी सकाळी 8-00 वा. मोटारने उस्मानपूरा, औरंगाबाद येथून कमालपूर, ता. श्रीरामपूर जि. अहमदनगरकडे प्रयाण. दु. सोयीनुसार मोटारने शिर्डी, ता. राहता, जि. अहमदनगर येथून उस्मानपूरा, औरंगाबादकडे प्रयाण. उस्मानपूरा, औरंगाबाद येथे आगमन व राखीव. मुक्काम औरंगाबाद.
            शुक्रवार, दि. 2 डिसेंबर रोजी सकाळी 10-00 वा. सिमेंट बंधारा भूमीपुजन समारंभ, स्थळ - वानेगाव, ता. फुलंब्री, जि. औरंगाबाद. सायं. 6-00 वा. कॉस्मो ई. एन.टी. हॉस्पिटलचा उद्घाटन समारंभ, स्थळ - प्लॉट नं. 536, कामगार चौक, एन-3, सिडको, औरंगाबाद. मुक्काम औरंगाबाद.
            शनिवार, दि. 3 डिसेंबर रोजी सकाळी राखीव. सायं. 4-40 वा. मोटारने औरंगाबाद येथून चिकलठाणा विमानतळ, औरंगाबादकडे प्रयाण. सायं. 5-00 वा. चिकलठाणा विमानतळ, औरंगाबाद येथे आगमन व राखीव. सायं. 6-00 वा. चिकलठाणा विमानतळ, औरंगाबाद येथून विमानाने मुंबईकडे प्रयाण.

Saturday 19 November 2016



जागतिक वारसा जतन करणे
ही काळाची गरज आहे
                 - डॉ.उमाकांत दांगट

        औरंगाबाद,‍दि. 19 : मराठवाड्यातील  ऐतिहासीक स्थळांचा जागतिक वारसा जतन करणे महत्वाचे असून अशा  जागतिक वास्तूंचे संवर्धन झाले पाहिजे असे प्रतिपादन विभागीय आयुक्त उमाकांत दांगट यांनी केले. दौलताबाद किल्यात भारतीय पूरातत्व विभागाच्या वतीने जागतिक हेरिटेज सप्ताहाचे  आयोजन करण्यात आले  आहे. या प्रसंगी ते बोलत होते.
            संपूर्ण भारतात भारतीय पूरातत्व सर्वेक्षण विभागातर्फे दि. 19 ते 25 नोव्हेंबर दरम्यान जागतिक हेरिटेज सप्ताहाचे आयोजन केले आहे. त्याचाच एक भाग म्हणून औरंगाबाद येथील पुरातत्व विभागाने दौलताबाद येथील ‍किल्यात या सप्ताहाचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमाला डॉ.बाबासाहेब आंबडेकर, मराठावाडा विद्यापीठाच्या पर्यटन विभागाच्या माजी प्रा.डॉ. दुलारी, कुरेशी, पुरातत्व विभागाचे सहायक संचालक शिवाकांत वाजपेयी ,दौलताबाद येथील देवगिरी विद्यालयाचे मुख्याध्यापिका श्रीमती निकाळजे, आदी मान्यवर उपस्थित होते.
            डॉ.दांगट म्हणाले की दौलतबाद किल्ला हा अतिप्रचिन वास्तू असून या परिसराचे व वास्तूचे  संवर्धन झाले पाहिजे यासाठी  येथील नागरिकांनी दक्ष राहावे, देशात ऐतिहासीक वास्तूच्या माध्यमातून  सर्व र्धम समभाव ही संकल्पना रुजविली गेली आहे. ऐतिहासीक  वास्तु हया  जगाला शांतता व समतेचा संदेश देणारे आहेत. औरंगाबाद जिल्हा पर्यटन जिल्हा  असून या ठिकाणी मोठया प्रमाणात पर्यटक येतात त्यामुळे येथील ऐतिहासीक वास्तूची महत्व  आहे, अशा वास्तूंचे जनतेने जतन व संवर्धन करून हा वारसा जपला पाहिजे, असे त्यांनी सांगितले.
             कार्यक्रमात महाराष्ट्रतील स्मारकीय, ऐतिहासीक वास्तुचे छायाचित्र प्रदर्शनाचे विभागीय आयुक्त डॉ. उमाकांत दांगट यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले , हे  प्रदर्शन दि. 19 ते 25  नोव्हेंबर 2016 पर्यंत   सकाळी 9 ते 5 या वेळात सर्वासाठी खुले आहे. यांचा सर्वानी लाभ घ्यावा, कार्यक्रमाचे  प्रास्ताविक येथील पुरातत्व विभागाचे सहायक संचालक शिवाकांत वाजपेयी यांनी केले. कार्यक्रमास पर्यटन प्रेमी, दौलताबाद येथील ग्रामस्थ, देवगिरी विद्यालयातील विद्यार्थी उपस्थित होते



.


विभागीय आयुक्त कार्यालयात
इंदिरा गांधी यांना अभिवादन

        औरंगाबाद,‍दि. 19 : दिवंगत माजी पंतप्रधान इंदिरा गांधी त्यांच्या जयंतीनिमित्त आज येथील विभागीय आयुक्त कार्यालयात त्यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी अपर आयुक्त गोविंद बोडखे यांनी इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन आदरांजली वाहिली. आजचा दिवस राष्ट्रीय एकात्मता दिन म्हणून पाळण्यात येतो. यानिमित्त या कार्यक्रमास उपस्थित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना अपर आयुक्तांनी राष्ट्रीय एकात्मतेची शपथ दिली.
            यावेळी उपायुक्त महेंद्र हरपाळकर, वर्षा ठाकूर, पारस बोथरा, सुर्यकांत हजारे, उपजिल्हाधिकारी  शिवाजी शिंदे, नायब तहसिलदार ए. जी. पटवारी  यांच्यासह विभागीय आयुक्त कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची या कार्यक्रमाला उपस्थिती होती.
याप्रसंगी विभागीय आयुक्त कार्यालयातील नायब तहसिलदार ए.जी. पटवारी यांनी इंदिरा गांधी यांच्या जीवनकार्याची माहिती उपस्थितांना दिली.