Tuesday 6 August 2019


   दि : 06 ऑगस्ट 2019
मराठवाड्यात रिमझिम पाऊस
विभागात 264 मि.मी.पाऊस
औरंगाबाद,दि. 6 (विमाका) :-गेल्या काही दिवसांपासून मराठवाड्यात ढगाळ वातावरण दिसून येत आहे. मात्र पावसाचा जोर अत्यंत कमी असून केवळ रिमझिम पाऊस पडत आहे. काही तालुक्यांमध्ये पावसाचे प्रमाण खूपच कमी आहे. मराठवाड्यात आजपर्यंत 264.79 मि.मी पावसाची नोंद झाली आहे. औरंगाबाद, नांदेड, हिंगोली जिल्ह्यात पावसाचे प्रमाण चांगले आहे. मात्र इतर जिल्हे अजूनही मोठ्या पावसाच्या प्रतिक्षेत आहेत.
            जिल्हानिहाय  आजपर्यंत झालेल्या पावसाची आकडेवारी पुढील प्रमाणे आहे. औरंगाबाद- 282.89 मि.मी, जालना - 245.56 मि.मी, परभणी -233.90 मि.मी, हिंगोली - 354.25 मि.मी, नांदेड 395.01 मि.मी, बीड 147.35 मि.मी. लातूर 235.48 मि.मी, आणि उस्मानाबाद 223.85 मि.मी.
आज सकाळी मागील चोवीस तासांतील पाऊस व कंसात आजपर्यंत झालेला पाऊस याची तालुकानिहाय आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे. सर्व आकडेवारी मिलीमीटर परिमाणात आहे.
औरंगाबाद जिल्हा- औरंगाबाद 8.40 (243.50), फुलंब्री 4.25 (308.50), पैठण 9.50 (180.33), सिल्लोड 7.13 (383.69), सोयगाव 11.33 (423.00), वैजापूर 5.10 (244.70), गंगापूर 2.11 (215.89), कन्नड 12.00 (304.75), खुलताबाद 14.67 (241.67). जिल्ह्यात एकूण 282.89 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.
जालना जिल्हा- जालना 0.38 (200.19), बदनापूर 1.20 (241.80), भोकरदन 1.13 (352.25), जाफ्राबाद 1.40 (288.80), परतूर 1.20 (219.04), मंठा 0.00 (260.25), अंबड 5.14 (207.57), घनसावंगी 0.86 (194.57), जिल्ह्यात एकूण 245.56 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.
परभणी जिल्हा- परभणी 1.25 (208.30), पालम 4.33 (206.00), पूर्णा 2.40 (295.00), गंगाखेड 2.50 (217.50), सोनपेठ 6.00 (232.00), सेलू 0.60 (201.00), पाथरी 9.00 (211.00), जिंतूर 0.83 (252.67), मानवत 4.67 (281.67), जिल्ह्यात एकूण पावसाची नोंद 233.90 मि.मी. झाली आहे.
हिंगोली जिल्हा- हिंगोली 2.14 (332.57), कळमनुरी 1.83 (446.92), सेनगाव 2.17 (324.33), वसमत 1.71 (237.43), औंढा नागनाथ 2.50 (430.00). जिल्ह्यात एकूण 354.25 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.
नांदेड जिल्हा- नांदेड 07.38 (358.88), मुदखेड 5.33 (418.67), अर्धापूर 4.33 (358.99), भोकर 4.25 (402.00), उमरी 0.00 (363.79), कंधार 19.67 (344.33), लोहा 2.58 (297.32), किनवट 3.57 (573.76), माहूर 9.00 (580.69), हदगाव 1.00 (414.56), हिमायत नगर 0.33 (492.33), देगलूर 5.83 (244.83), बिलोली 6.60 (424.00), धर्माबाद 6.00 (360.67), नायगाव 3.20 (374.00), मुखेड 4.71 (311.43), जिल्ह्यात एकूण 395.01 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.

बीड जिल्हा- बीड 3.55 (135.73), पाटोदा 2.25 (176.00), आष्टी 2.86 (160.00), गेवराई 1.10 (110.20), शिरुर कासार 2.67 (104.00), वडवणी 8.50 (128.50), अंबाजोगाई 0.00 (146.40), माजलगाव 5.63 (199.37), केज 0.00 (148.57), धारुर 3.67 (130.67), परळी 1.60 (181.44), जिल्ह्यात एकूण 147.35 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.
लातूर जिल्हा- लातूर 0.00 (158.50), औसा 0.86 (160.00), रेणापूर 0.50 (199.00), उदगीर 0.00 (252.29), अहमदपूर 1.83 (306.17), चाकुर 0.20 (212.40), जळकोट 1.50 (308.00), निलंगा 5.38 (251.25), देवणी 0.00 (267.50), शिरुर अनंतपाळ 0.00 (239.67), जिल्ह्यात एकूण 235.48 मि.मी. पाऊस झाला आहे.
उस्मानाबाद जिल्हा- उस्मानाबाद 4.00 (214.13), तुळजापूर 12.14 (285.00), उमरगा 12.00 (298.60), लोहारा 17.67 (291.33), कळंब 1.67 (168.17), भूम 3.20 (210.30), वाशी 3.67 (195.67), परंडा 5.20 (127.60), जिल्ह्यात एकूण 223.85 मि.मी. पाऊस झाला आहे.
******

चार वर्षांत धान्य साठवणूक क्षमतेत 1 लाख 17 हजार मे. टनाने वाढ

मुंबई, दि. 6:  गेल्या चार वर्षात राज्यातील अन्नधान्य साठवणूक क्षमता जवळपास 1 लाख 17 हजार मे. टनाने वाढली आहे. सन  2014 मध्ये राज्याची साठवणूक क्षमता 5 लाख 18 हजार 829 मे. टन होती. तर आता सन 2018 पर्यंतची साठवणूक क्षमता 6 लाख 35 हजार 887 मे. टन झाली असल्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री संभाजी पाटील- निलंगेकर यांनी सांगितले.
चार वर्षांत साठवणूक क्षमता 1 लाख 17 हजार 058 मे. टनाने वाढली आहे. अन्न महामंडळाची जिल्हा स्तरावरील गोदामे आणि रास्त भाव दुकानदार यांमध्ये राज्य शासनाची तालुका स्तरावरील गोदामे हा मुख्य दुवा आहे. तेथूनच दुकानदारांना धान्य पाठवले जाते. ही व्यवस्था अधिक प्रभावीपणे राबविली जाण्यासाठी राज्यातील गोदामांचे जाळे सक्षम करण्यात आले आहे.
सार्वजनिक वितरण व्यवस्थेसाठी लागणारे अन्नधान्य ठेवण्यासाठी नवीन गोदामांच्या बांधकामासाठी प्रयत्न होत आहेत.  धान्य नियतनाच्या (वाटपाच्या) पध्दतीमध्ये बदल करण्यात आला आहे. आता संबंधित महिन्याचे नियतन आधीच्या महिनाअखेरीपर्यंतच पूर्ण करण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे आधीच्या महिन्याचे धान्यवाटप दुकानदाराकडून पूर्ण होईपर्यंत त्यांच्याकडे नव्या महिन्यासाठीचे धान्य पोचण्याची व्यवस्था झाली आहे. नव्या महिन्याच्या पहिल्या तारखेपासूनच संबंधित विक्रेता महिन्याचे धान्यवाटप करु शकतो.  त्यामुळे हाती पैसे असताना शिधापत्रिकाधारकांना धान्य उचलण्याची संधी मिळत असल्याचे विभागाचे प्रधान सचिव महेश पाठक यांनी सांगितले.
०००००