Friday 16 August 2019

माजी सैनिकांच्या पाल्यांना पंतप्रधान शिष्यवृत्तीसाठी
अर्ज स्वीकारण्याची 31 ऑक्टोबरपर्यंत मुदत
         औरंगाबाद,दि.16  ‍–माजी सैनिकांच्या पाल्यांनी बारावीत 60 टक्के किंवा अधिक गुण घेऊन व्यावसायिक शिक्षणासाठी प्रवेश घेतला आहे. (जसे अभियांत्रिकी, वैद्यकीय, शेतकी, तसेच MBA, BBA, Computer इत्यादी). तसेच पदवी परीक्षेत 60 टक्के गुण घेऊन पदव्युत्तर व्यावसायिक कोर्सेससाठी सुद्धा ही शिष्यवृत्ती माजीसैनिकांच्या पाल्यांना लागू आहे. ही शिष्यवृत्ती मुलांना वार्षिक रू. 24 हजार व मुलींना 27 हजार दिली जाते व त्यांनी प्रवेश घेतलेले कोर्स पूर्ण होईपर्यंत मिळत असते. त्यासाठी माजीसैनिकांना ksb.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करणे आवश्यक आहे. या सबंधीची अधिक माहिती व अर्ज सादर करण्याची पद्धत ksb.gov.in संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
तरी पात्र माजी सैनिकांनी त्यांच्या पाल्यांचे 31 ऑक्टोबरपूर्वी ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरावा. अर्ज सादर करताना काही अडचण आल्यास जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, औरंगाबाद यांच्याशी दूरध्वनी क्र. 2370313 वर संपर्क करावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, औरंगाबाद यांनी केले आहे.
******

व्यवसाय शिक्षण मंडळाच्या परीक्षा
अतिवृष्टीमुळे 20 ऑगस्टपर्यंत पुढे ढकलल्या
         औरंगाबाद,दि.16  ‍– महाराष्ट्र राज्य व्यवसाय शिक्षण परीक्षा मंडळामार्फत सहामाही  आणि  एक वर्ष कालावधी अभ्यासक्रम परीक्षा जुलै 2019 10 ऑगस्ट ते 23 ऑगस्टपर्यंत होणार होती. परंतु महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी झालेल्या अतिवृष्टीने पूर परिस्थिती निर्माण झाली. त्यामुळे या परीक्षा 20 ऑगस्टपर्यंत पुढे ढकलेल्या आहेत. प्रमाणपत्र अभ्यासक्रमाचे पेपर (सहा माही व एकवर्ष कालावधी अभ्यासक्रम परीक्षा) 20 ऑगस्ट ते 31 ऑगस्ट या कालावधीत घेण्यात येतील. परीक्षेचे वेळापत्रक मंडळाकडून प्राप्त होताच संस्थांना कळविण्यात येईल, याची संस्था व विद्यार्थ्यांनी  नोंद घ्यावी, असे जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी यांनी आवाहन केले आहे.
******