Thursday 17 November 2016



महाराष्ट्र माझा छायाचित्र प्रदर्शनास
   नागरिकांचा उत्तम प्रतीसाद  

            औरंगाबाद, दि. 17 :- राज्य शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, मराठवाडा विभागाच्यावतीने  खोकडपुरा येथील सामाजिक न्याय भवनातील  सभागृहात, दि. 10 ते 19 नोव्हेंबर 2016  पर्यंत आयोजित  केलेल्या महाराष्ट्र माझा छायाचित्र प्रदर्शनास नागरिकांचा उत्तम प्रतीसाद लाभत आहे.
             या प्रदर्शनात सांस्कृतिक, पर्यटन, प्राचीन भारतीय कला, संस्कृती, इतिहासाचा वारसा,  लोकपंरपरा, वन्यजीव आदी व वैविध्यपूण व जागतिक दर्जाचे छायाचित्र या प्रदर्शनात लावण्यात आले आहे. संपुर्ण महाराष्ट्रतील वैविध्यपूर्ण संस्कृतीचे दर्शन एकाच वेळी एकाच ठिकाणी प्रदर्शनाच्या माध्यमातून  नागरीकांना पाहव्यास मिळत आहे. मुंबई नतंर प्रथमच औरंगाबादला हे  छायाचित्र प्रदर्शन भरविण्यात आले आहे.
प्रदर्शनात आतापर्यंत भेट देण्याऱ्या नागरिकांनी प्रदर्शन आयोजकांना धन्यवाद दिले असून प्रदर्शनास भेट देण्याऱ्या नागरिकांपैकी वैजापूर येथील शेतकरी हंसराज गवळी, यांनी या वेळी  सांगितले, की असे प्रदर्शन ग्रामीण भागातसध्दा भरवले जावे, या प्रदर्शनातून  शेती, ऊर्जा, पर्यटन, पाणी, स्वच्छ भारत अभियान यासह अनेक महत्वाच्या विषयाची माहिती छायाचित्र प्रदर्शनतून मिळाली.  औरंगाबाद येथील विमल बनसोडे म्हणाल्या की,  राज्यातील  विविध विषयांच्या माहितीवर आधारीत हे प्रदर्शन आहे. ‍मराठवाडातील जनतेला या प्रदर्शनाच्या माध्यमातून चांगली माहिती उपलब्ध झाली आहे. औरंगाबाद येथील शिक्षक संजय तुपे, यांनी संगितले, की राज्यात विविध क्षेत्रात विकास विषयक भरीव कामगिरी झाली आहे त्याची माहिती प्रदर्शनातून मिळली.
प्रदर्शन हे  दि. 19 नोव्हेंबर पर्यंत सकाळी 10 ते सांयकाळी 6 वा. या वेळेत सर्वासाठी विनमुल्य खुले राहणार आहे. शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थी, पत्रकारितेचे विद्यार्थी, नागरिकांनी या प्रदर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, मराठवाडा विभागातर्फे करण्यात आले आहे.