Monday 26 August 2019


अन्न व्यावसायिकांसाठी अन्न प्रशासन विभागाचे आवाहन
औरंगाबाद, दि.26 : अन्न व्यावसायिक परवाना, नोंदणी नसताना ‍किंवा त्याची मुदत संपलेली असताना अन्न व्यवसाय करतात. विना परवाना अन्न व्यवसाय करणे कायद्यान्वये गुन्हा आहे. तसेच बरेचशे अन्न व्यावसायिक चुकीच्या संवर्गात अन्न परवाना घेऊन व्यवसाय करतात. त्याअनुषंगाने अन्न व  औषध प्रशासन औरंगाबाद कार्यालयातर्फे सर्व अन्न व्यावसायिकांनी 30 सप्टेंबर 2019 पूर्वी https://foodlicensing.fssai.gov.in/knowfssailicense/  या url वर त्यांचे पात्रता, परवाना status,  परवान्यात नमूद अन्न पदार्थाबाबत खात्री करावी व त्याअनुषंगे नवीन परवान्यासाठी , फेरबदला करता अर्ज दाखल करावा, असे आवाहन  सह आयुक्त (अन्न), अन्न व औषध प्रशासन यांनी  केले आहे.
अन्न व्यावसायिक ज्याच्याकडे परवाना असणे आवश्यक असताना नोदंणी घेऊन व्यवसाय करतात. ज्यांच्याकडे परवाना नाही ‍किंवा  त्यांच्या परवान्याची मुदत संपलेली आहे. अन्न व्यावसायिक परवाना नूतनीकरण करणे आवश्यक असताना दंड वाचविण्यासाठी  नवीन परवाना घेतला आहे.  उत्पादक, प्रक्रिया करणारे अन्न व्यावसायिक अन्न पदार्थ परवान्यात नूमद नसणे यासाठी विशेष मोहिम विभागामार्फत राबवण्यात येणार असून‍ दिनांक 01 ऑक्टोबर 2019 पासून पुढे अंमलबजावणी प्राधिकरणाकडून कर्तव्यात कसूर अन्न व्यावसायिकांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे सह आयुक्त (अन्न) अन्न व औषध प्रशासन यांनी कळविले आहे.   
******

झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजनेसाठी
प्रस्ताव पाठवण्याचे आवाहन
औरंगाबाद, दिनांक 26  - डॉ. झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजना सन 2019-20 अंतर्गत 31 ऑगस्ट 2019 पर्यंत प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे करण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत प्रस्ताव सादर करण्या करीता शासन निर्णय व आवश्यक कागदपत्राची यादी https:mdd.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर आहे. इच्छुक संस्थाचालकांनी मदरसांचे परिपूर्ण प्रस्ताव शासन निर्णयातील अटी व शर्ती नुसार जिल्हाधिकारी कार्यालयात 31 ऑगस्ट 2019 पर्यंत सादर करावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे इच्छुक मदरसा चालकांना केले आहे.
*****

अल्पसंख्यांक बहुल शाळांना पायाभूत सुविधा
अनुदानासाठी अर्ज करण्याचे आवाहन
औरंगाबाद, दिनांक 26  - अल्पसंख्यांक विकास विभाग, मंत्रालय मुंबई यांचेमार्फत सन 2019-20 या वर्षासाठी जिल्ह्यात अल्पसंख्यांक बहुल शासनमान्य खाजगी शाळा, कनिष्ठ महाविद्यालय, औद्यागिक प्रशिक्षण संस्था व अपंग शाळांमध्ये पायाभूत सुविधांसाठी अनुदान ही योजना राबविण्यात येत असल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे कळविण्यात आले आहे.
या योजअंतर्गत प्रस्ताव सादर करण्याकरिता शासन निर्णय व आवश्यक कागदपत्रांची यादी  https:mdd.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. इच्छुक संस्थाचालकांनी शाळांचे परिपूर्ण प्रस्ताव शासन निर्णयातील अटी व शर्ती नुसार जिल्हाधिकारी कार्यालयात 31 ऑगस्ट 2019 पर्यंत सादर करावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे इच्छुक शाळेच्या संस्थाचालकांना करण्यात येत आहे.
******

कनिफ फातेमा हबीबखॉन मृत्यूप्रकरणी चौकशी अधिकारी म्हणून
उपविभागीय अधिकारी यांची नियुक्ती
          औरंगाबाद, दिनांक 26  -  न्यायालयीन बंदी क्र.2798/2019 मयत कनिफ फातेमा हबीबखॉन यांचे निधन झालयामुळे व कनिफ बंदी असल्याने त्याची मृत्यूची दंडाधिकारी चौकशी करणे गरजेचे आहे. म्हणून जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी यांनी औरंगाबाद फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 176 नुसार, उपविभागीय दंडाधिकारी औरंगाबाद यांची दंडाधिकारी चौकशी करणे कामी चौकशी अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे.
औरंगाबाद उपविभागीय दंडाधिकारी यांना फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 176 प्रमाणे अधिकार राहतील. तसेच उपविभागीय दंडाधिकारी औरंगाबाद हे मृत्यूचे कारण, मृत्यू कोणत्या परिस्थितीत झाला, दंडाधिकारी यांचा निर्णय, निष्कर्ष या मुद्यावर चौकशी करतील, असे जिल्हाधिकारी यांनी आदेशात नमूद केले आहे.
******

जिल्हाधिकारी कार्यालयात
3 सप्टेंबर रोजी लोकशाही दिन
औरंगाबाद, दिनांक 26 - प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी लोकशाही दिन जिल्हास्तरावर आयोजित करण्यात येतो.   सप्टेंबर महिन्याचा लोकशाही दिन दि. 3 सप्टेंबर रोजी दु. 1 वा. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित करण्यात आल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत कळविले आहे.
लोकशाही दिनामध्ये  पोलिस आयुक्त, पोलिस अधीक्षक (ग्रामीण), मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, पाटबंधारे विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, वीज वितरण कंपनी, परिवहन महामंडळ, जिल्हा उपनिबंधक, कृषी विभाग, पाणी पुरवठा अधिकारी उपस्थित राहतील. या विभागातील तक्रारी संबंधांत निवेदने, अडीअडचणीबाबतचे तक्रार अर्ज जिल्हाधिकारी कार्यालयात दोन प्रतीत विहित नमुन्यात सादर करावा. तक्रार, निवेदन वैयक्तिक स्वरुपाचे असावे. अर्जदारांनी तालुकास्तरीय लोकशाही दिनात तक्रार अर्ज सादर करुन त्याची पोचपावती जिल्हास्तरीय लोकशाही दिनात सादर करण्यात येणाऱ्या अर्जासोबत जोडावी. न्यायप्रविष्ठ प्रकरणे, राजस्वी, अपिल्स, सेवाविषयक, आस्थापनाविषयक बाबींचा यात समावेश नसावा. त्रयस्थांमार्फत अर्ज पाठवू नये. तक्रारदारांनी, निवेदनकर्त्यांनी स्वत: सकाळी 11 ते दु. 1 वाजेपर्यंत तक्रार, निवेदन दाखल करावे व लोकशाही दिनात उपस्थित रहावे, असेही जिल्हाधिकारी कार्यालयाने कळविले आहे.
                                               *******

महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धा
प्रवेशिका पाठविण्यासाठी 16 सप्टेंबर पर्यंत मुदतवाढ
औरंगाबाद, दि.26  :- शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने येत्या 15 नोव्हेंबर 2019 पासून सुरु होणाऱ्या राज्य नाट्य स्पर्धांसाठी हौशी नाट्य संस्थांकडून दिनांक 1 ऑगस्ट ते 31 ऑगस्ट, 2019 पर्यंत प्रवेशिका मागविण्यात ल्या होत्या. परंतु राज्यातील काही जिल्ह्यांतील पूरस्थिती पाहता तसेच या जिल्ह्यांतील जनजीवन सुरळीत होण्यासाठी अजून कालावधी लागणार असल्याने राज्य नाट्य स्पर्धेच्या प्रवेशिका भरण्याची मुदत दिनांक 16 सप्टेंबर पर्यंत वाढविण्यात येत आहे.
             59 व्या हौशी मराठी नाट्य स्पर्धेची प्राथमिक फेरी दिनांक 15 नोव्हेंबर, 2019 पासून महाराष्ट्र राज्यातील विविध स्पर्धा केंद्रांवर आयोजित करण्यात येणार आहे. तसेच 59 व्या महाराष्ट्र राज्य हौशी हिंदी, संगीत संस्कृत नाट्य स्पर्धांची अंतिम फेरी जानेवारी 2020 पासून प्रत्येकी एका केंद्रावर आयोजित करण्यात येणार आहे.
         नाट्य स्पर्धेकरीता रु.3,000/- इतक्या अनामत रकमेचा धनाकर्ष स्पर्धक संस्थेने संचालक, सांस्कृतिक कार्य, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांचे नावे पाठवावयाचा आहे. प्रयोग सादर केल्यानंतर त्याच रकमेचा धनाकर्ष (डीडी) संस्थांना परत करण्यात येईल.
            नोंदणीकृत हौशी नाट्य संस्थांना तसेच गतवर्षी राज्यनाटय स्पर्धेत सहभागी झालेल्या नाट्य संस्थांना स्पर्धेसाठी विहित नमुन्यातील प्रवेशिका, नियम संचालनालयाच्या www.mahasanskruti.org या वेबसाईटवरनवीन संदेशया मथळयाखाली उपलब्ध होतील. आवश्यक त्या कागदपत्रासह प्रवेशिका दि. 16 सप्टेंबर 2019 पर्यंत खालील पत्त्यावर सादर कराव्यात.
1)     मुंबई, कोकण नाशिक विभागातील संस्थांनी संचालक, सांस्कृतिक कार्य संचालनालय, जुने सचिवालय, विस्तार भवन, पहिला मजला, महात्मा गांधी मार्ग, मुंबई-32 (022-22043550) या पत्त्यावर प्रवेशिका सादर कराव्यात.
2)     पुणे महसूल विभागातील संस्थांनी, सहाय्यक संचालक, सांस्कृतिक कार्य संचालनालय, विभागीय कार्यालय, बंगला क्रमांक-4, विमानतळ रोड, पुणे (7588091301) या पत्त्यावर प्रवेशिका सादर कराव्यात.
3)     औरंगाबाद महसूल विभागातील संस्थांनी सहाय्यक संचालक, सांस्कृतिक कार्य संचालनालय, विभागीय कार्यालय, रुम नंबर-02, एमटीडीसी बिल्डिंग, गोल्डी टॉकीजच्या समोर, स्टेशन रोड, औंरगाबाद-431005 (0240-2339055) या पत्त्यावर प्रवेशिका सादर कराव्यात.
4)   नागपूर अमरावती महसूल विभागातील संस्थांनी सहाय्यक संचालक, सांस्कृतिक कार्य संचालनालय, विभागीय कार्यालय, द्वारा : अभिरक्षक, मध्यवर्ती संग्रहालय, अस्थायी प्रदर्शन हॉल, तळमजला, सिव्हिल लाईन, नागपूर-440001 (0712-2554211) या पत्त्यावर प्रवेशिका सादर कराव्यात.
            विहित मुदतीनंतर प्राप्त होणाऱ्या प्रवेशिका कोणत्याही परिस्थितीत स्वीकारल्या जाणार नाहीत. प्रवेशिकेसोबत आवश्यक असणारी कागदपत्रे जोडलेली नसल्यास किंवा संपूर्ण तपशी भरला नसल्यास प्रवेशिका अपात्र ठरविण्यात येईल. प्रवेशिकेतील त्रुटींच्या संदर्भात कोणताही पत्रव्यवहार केला जाणार नाही, याची सर्व स्पर्धक संस्थांनी कृपया नोंद घ्यावी.
            स्पर्धेसाठी संस्थेची निवड झाल्यानंतर संस्थेने शासनाने निश्चित केलेल्या केंद्रावर दिलेल्या तारखेस प्रयोग सादर केला नाही, तर त्यांची प्रवेशिकेसोबत भरलेली अनामत रक्कम शासकीय कोषागारात जमा करण्यात येईल. नाट्यस्पर्धेकरीता संस्थांना शासन नियम बंधनकारक राहतील. नियमांचे उल्लंघन केल्यास संस्थेला अपात्र ठरविण्यात येईल, असे सांस्कृतिक कार्याच्या प्र. संचालक श्रीमती मीनल जोगळेकर यांनी कळविले आहे.