Saturday 19 November 2016



जागतिक वारसा जतन करणे
ही काळाची गरज आहे
                 - डॉ.उमाकांत दांगट

        औरंगाबाद,‍दि. 19 : मराठवाड्यातील  ऐतिहासीक स्थळांचा जागतिक वारसा जतन करणे महत्वाचे असून अशा  जागतिक वास्तूंचे संवर्धन झाले पाहिजे असे प्रतिपादन विभागीय आयुक्त उमाकांत दांगट यांनी केले. दौलताबाद किल्यात भारतीय पूरातत्व विभागाच्या वतीने जागतिक हेरिटेज सप्ताहाचे  आयोजन करण्यात आले  आहे. या प्रसंगी ते बोलत होते.
            संपूर्ण भारतात भारतीय पूरातत्व सर्वेक्षण विभागातर्फे दि. 19 ते 25 नोव्हेंबर दरम्यान जागतिक हेरिटेज सप्ताहाचे आयोजन केले आहे. त्याचाच एक भाग म्हणून औरंगाबाद येथील पुरातत्व विभागाने दौलताबाद येथील ‍किल्यात या सप्ताहाचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमाला डॉ.बाबासाहेब आंबडेकर, मराठावाडा विद्यापीठाच्या पर्यटन विभागाच्या माजी प्रा.डॉ. दुलारी, कुरेशी, पुरातत्व विभागाचे सहायक संचालक शिवाकांत वाजपेयी ,दौलताबाद येथील देवगिरी विद्यालयाचे मुख्याध्यापिका श्रीमती निकाळजे, आदी मान्यवर उपस्थित होते.
            डॉ.दांगट म्हणाले की दौलतबाद किल्ला हा अतिप्रचिन वास्तू असून या परिसराचे व वास्तूचे  संवर्धन झाले पाहिजे यासाठी  येथील नागरिकांनी दक्ष राहावे, देशात ऐतिहासीक वास्तूच्या माध्यमातून  सर्व र्धम समभाव ही संकल्पना रुजविली गेली आहे. ऐतिहासीक  वास्तु हया  जगाला शांतता व समतेचा संदेश देणारे आहेत. औरंगाबाद जिल्हा पर्यटन जिल्हा  असून या ठिकाणी मोठया प्रमाणात पर्यटक येतात त्यामुळे येथील ऐतिहासीक वास्तूची महत्व  आहे, अशा वास्तूंचे जनतेने जतन व संवर्धन करून हा वारसा जपला पाहिजे, असे त्यांनी सांगितले.
             कार्यक्रमात महाराष्ट्रतील स्मारकीय, ऐतिहासीक वास्तुचे छायाचित्र प्रदर्शनाचे विभागीय आयुक्त डॉ. उमाकांत दांगट यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले , हे  प्रदर्शन दि. 19 ते 25  नोव्हेंबर 2016 पर्यंत   सकाळी 9 ते 5 या वेळात सर्वासाठी खुले आहे. यांचा सर्वानी लाभ घ्यावा, कार्यक्रमाचे  प्रास्ताविक येथील पुरातत्व विभागाचे सहायक संचालक शिवाकांत वाजपेयी यांनी केले. कार्यक्रमास पर्यटन प्रेमी, दौलताबाद येथील ग्रामस्थ, देवगिरी विद्यालयातील विद्यार्थी उपस्थित होते



.

No comments:

Post a Comment