Saturday 19 November 2016



नहर-ए- अंबरी ऐतिहासिक परिसरात
 हेरिटेज वॉक चे आयोजन
            औरंगाबाद, दि. 19 :- येथील हरसूल रोडवरील नहर-ए- अंबरी या ऐतिहासिक परिसरात आज सकाळी 7 वा हेरिटेज वॉकचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी अपर आयुक्त गोविंद बोडखे, जिल्हा परिषद मुख्यकार्यकारी आधिकारी मधुकर अर्कड, पुरातत्व विभागाचे सहायक संचालक शिवाकांत बाजपेयी, उपजिल्हाधिकारी शिवाजी शिंदे, पर्यटन महामंडळाचे प्रादेशिक व्यवस्थापक अण्णासाहेब शिंदे, जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी वासुदेव सोळंखे, शहरातील इतिहासाचे ज्येष्ठ अभ्यासक रमजान शेख, प्रदीप देशपांडे उपस्थित होते.
इतिहासाचे ज्येष्ठ अभ्यासक रमजान शेख  यांनी यावेळी नहर-ए- अंबरी या ऐतिहासिक विहिरी विषयी माहिती देतांना सांगितले की शहर व परिसरात एकून 14 जुन्या ऐतिहासिक विहिरी (नहर) असून नहर-ए- अंबरी त्यापैकी एक आहे. इ.स. 1916 मध्ये मलीक अंबर यांनी ही नहर-ए- अंबरी तयार केली असून या नहर-ए- अंबरीद्वारे त्याकाळी शहराला मोफत पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यात येत होता. मालिक अंबर  जुन्याकाळातील अभियंता होते त्यांच्या देखरेखी खाली याचे बांधकाम केले होते. गायीच्या मुख्यासारखे विहिरीचे बांधकाम करून गोमूखातून पाणी येत असे म्हणून याला गायमुख असे म्हणत असत या ऐतिहासिक विहिरीचे संवर्धन केल्यास येथे पर्यटन स्थळ निर्माण होईल, पर्यटकांना यांचे महत्व समजेल अशी अपेक्षा त्यांनी यावेळी  व्यक्त केली.
            या हेरिटेज वॉक प्रसंगी पुरातत्व विभागाचे सहायक संचालक श्री बाजपेयी  इतिहास अभ्यासक प्रदीप देशपांडे यांनी या विषयी माहिती दिली. जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी मधुकर अर्कड यांनी आभार व्यकत केले. याप्रसंगी परिसरातील नागरिक, पर्यटन वियषक  अभ्यायक उपस्थित होते.



No comments:

Post a Comment