Friday 14 October 2016



‘भेट महाराष्ट्र 2017’
उपक्रम साजरा करणार
                                     - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

औरंगाबाद दि. 14-  पुढील वर्ष हे ‘भेट महाराष्ट्र 2017’ या उपक्रमाने पर्यटकांना चालना देण्यासाठी मोठ्या प्रमाणात साजरे केले जाणार आहे असे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले.
वेरुळ-अजिंठा महोत्सव आंतरराष्ट्रीय 2016 च्या उद्घाटन प्रसंगी वेरुळ येथे कैलास लेण्याच्या पायथ्याशी आयोजित उद्घाटन प्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते. या प्रसंगी विधानसभा अध्यक्ष हरीभाऊ बागडे, पर्यटन मंत्री जयकुमार रावल, पर्यटन राज्य मंत्री मदन येरावार, श्रीमती अमृता फडणवीस, राज्य महिला आयोग अध्यक्षा सौ. विजया राहटकर, वक्फ बोर्ड अध्यक्ष एम.एम. शेख, आ. सुभाष झांबड, आ. प्रशांत बंब, आ. अतुल सावे, माजी मंत्री राजेंद्र दर्डा, श्रीमती सुभद्रादेवी रावल, राज्याचे मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय, पर्यटन विभागाच्या प्रधान सचिव वल्सा नायर सिंह, पर्यटन महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. के.एच. गोविंदराज, विभागीय आयुक्त डॉ. उमाकांत दांगट, महानंदचे व्यवस्थापकीय संचालक दिलीप शिंदे, पर्यटन संचालक सतीश सोनी, जिल्हाधिकारी डॉ. निधी पांडेय, पोलीस अधिक्षक नवीनचंद्र रेड्डी, म.न.पा आयुक्त ओमप्रकाश बोकरीया, मुख्य कार्यकारी अधिकारी मधुकरराजे आर्दड यांची प्रमुख उपस्थिती होती.
            निर्सगदत्त  प्रफुलीत पोर्णिमा पुर्व चंद्र प्रकाशात हा महोत्सव आयोजित झाला. अशा या आल्हादायक प्रसंगी पर्यटनाला चालना देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, औरंगाबाद येथील विमानतळाच्या विकासासाठी दोनशे कोटी रुपयाची तरतूद करण्यात आली आहे. तसेच वेरुळ पर्यटन  आराखड्याला मान्यता देण्यात आली आहे. पर्यटन विकासाचे काम सोईसकर व्हावे, व पर्यटकांच्या सुविधेत वाढ व्हावी म्हणून औरंगाबाद येथे पर्यटन संचालनालयाचे कार्यालय स्थापन करण्यात येईल व तेथे सहायक संचालक दर्जाचा अधिकारी नियुक्त केला जाईल.
            राज्याची ओळख ही तेथील कला व संस्कृती किती समृध्द आहे यांच्यावरुन होत असते असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. राज्यातील वेरुळ-अजिंठा लेण्या जागतिक स्थळावर किती प्रसिध्द आहे. हे सांगत असताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी मंगोलियातील डयुन हाँग या शहराच्या लेण्या संबंधीचे उदाहरण दिले.  मुख्यमंत्री फडणवीस यांनी डयुन हाँग येथे भेट दिली. त्याचा उल्लेख करुन ते म्हणाले की, हजार वर्षापुर्वी मंगोलियाचे पर्यटक अजिंठा येथे येवून लेण्याची माहिती घेऊन गेले व त्यांनी तेथे हबेहुब लेण्या साकारल्या त्या अजिंठ्या सारख्या ओरिजनल वाटतात पण तेथील लोक अजिंठाचा उल्लेख करतात. एवढा जागतिक वारसा आपल्या अजिंठा- वेरुळला लाभला आहे.
            प्रारंभी पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांनी प्रास्ताविकात  वेरुळ-अजिंठा महोत्साच्या आयोजनाच्या संबंधात माहिती दिली. या महोत्सव दरवर्षा आयोजित केला जाईल असे सांगितले.
            कॉफी टेबल बुक चे प्रकाशन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. तर एक्सप्लोअर एलोरा या पुस्तकाचे प्रकाशन श्री. हरीभाऊ बागडे व श्री. जयकुमार रावल यांच्या हस्ते झाले. अमेंझिंग आर्टीस्टस् या पुस्ताकांचे प्रकाशन पर्यटन राज्यमंत्री मदन येरावार यांच्या हस्ते झाले. महाराष्ट्र अनलिमीडेट या मासिकाचे प्रकाशन मुख्यमंत्री व अन्य मान्यवरांच्या हस्ते झाले.
            प्रारंभी मुख्यमंत्री यांनी दीप प्रज्वलन करुन या आंतरराष्ट्रीय महोत्सवाचे उद्घाटन केले. पंडीत उध्दवराव शिंदे आपेगावकर यांच्या जुगलबंदीचा आस्वादही मुख्यमंत्रीसह सर्वांनी घेतला.





No comments:

Post a Comment