Saturday, 19 November 2016



विभागीय आयुक्त कार्यालयात
इंदिरा गांधी यांना अभिवादन

        औरंगाबाद,‍दि. 19 : दिवंगत माजी पंतप्रधान इंदिरा गांधी त्यांच्या जयंतीनिमित्त आज येथील विभागीय आयुक्त कार्यालयात त्यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी अपर आयुक्त गोविंद बोडखे यांनी इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन आदरांजली वाहिली. आजचा दिवस राष्ट्रीय एकात्मता दिन म्हणून पाळण्यात येतो. यानिमित्त या कार्यक्रमास उपस्थित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना अपर आयुक्तांनी राष्ट्रीय एकात्मतेची शपथ दिली.
            यावेळी उपायुक्त महेंद्र हरपाळकर, वर्षा ठाकूर, पारस बोथरा, सुर्यकांत हजारे, उपजिल्हाधिकारी  शिवाजी शिंदे, नायब तहसिलदार ए. जी. पटवारी  यांच्यासह विभागीय आयुक्त कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची या कार्यक्रमाला उपस्थिती होती.
याप्रसंगी विभागीय आयुक्त कार्यालयातील नायब तहसिलदार ए.जी. पटवारी यांनी इंदिरा गांधी यांच्या जीवनकार्याची माहिती उपस्थितांना दिली.


No comments:

Post a Comment