Saturday, 2 November 2019

शेतकऱ्यांच्या हितालाच सर्वोच्च प्राधान्य - पालकमंत्री एकनाथ शिंदे

शेतकऱ्यांच्या हितालाच सर्वोच्च प्राधान्य- पालकमंत्री एकनाथ शिंदे
  पालकमंत्र्यांनी केली शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन नुकसानीची पाहणी
औरंगाबाद, दिनांक 2(जिमाका)परतीच्या  पावसाने  शेतकऱ्यांच्या  पिकांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे.  प्रत्येक नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याबाबत कार्यवाही करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी गंगापूर, कन्नड आणि खुलताबाद तालुक्यातील शेतकऱ्यांशी संवाद साधताना सांगितले.शासन शेतकऱ्यांच्या हितालाच प्राधान्य देईल असेही ते म्हणाले.
गंगापूर तालुक्यातील सिध्दनाथ वडगाव येथे दिलीप बैनाडे, संजय बैनाडे यांच्या मका आणि कापूस पिकांच्या नुकसानीची त्यांच्या शेताच्याबांधावर जाऊन श्री. शिंदे यांनी पाहणी केली. पाहणीनंतर त्यांनी येथील शेतकऱ्यांशी संवाद साधला. पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे. पीक विमा कंपनी, कृषी विभाग यांनी प्रत्येक शेतकऱ्याच्या नुकसानीचा पंचनामा करून शेतकरी निहाय नुकसान भरपाई देण्यात यावी, यासाठी शासन सकारात्मक आहे. नुकसान भरपाई ही प्रत्येक नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मिळणार आहे. मदतीपासून कोणीही वंचित राहणार नाही, अशी ग्वाही देखील श्री. शिंदे यांनी शेतकऱ्यांना दिली.
                सिध्दनाथ वडगाव येथे बैनाडे बंधुंच्या बांधावर खासदार अनिल देसाई, आमदार अंबादास दानवे, आमदार प्रदीप जैस्वाल, आमदार रमेश बोरनारे, जिल्हा परिषद अध्यक्ष देवयानी डोनगावकर, माजी खासदार चंद्रकांत दानवे आदींची उपस्थिती होती.
पळसवाडीत पाहणी
खुलताबाद तालुक्यातील पळसवाडी येथे देविदास देवरे यांच्या शेतात झालेल्या मका पिकाच्या नुकसानीची पाहणी पालकमंत्री श्री. शिंदे यांनी केली. पाहणी दरम्यान येथील शेतकऱ्यांशी संवाद साधला. शेतकरी हा देशाचा कणा आहे. शेतकऱ्यांचे परतीच्या पावसाने मोठे नुकसान झाले. परंतु शेतकऱ्यांनी खचून जाऊ नये, शासन तुमच्या खंबीरपणे पाठिशी असल्याचे यावेळी शेतकऱ्यांना सांगितले. तसेच शेतकऱ्याच्या हितासाठी आवश्यक ते सर्व काही करू, असेही ते म्हणाले. यावेळी त्यांचे सोबत खासदार अनिल देसाई, आमदार अंबादास दानवे, आमदार उदयसिंह राजपूत, जिल्हा परिषद अध्यक्ष देवयानी डोनगावकर, माजी खासदार चंद्रकांत खैरे आदींची उपस्थिती होती.
करंजखेड्यात शेतकऱ्यांना दिलासा
कन्नड तालुक्यातील करंजखेडा येथे विठ्ठल सोळंके, सुधाकर ताजने यांच्यासह येथील अन्य शेतकऱ्यांशी त्यांच्या शेताच्या बांधावर पालकमंत्री श्री. शिंदे यांनी संवाद साधला.परतीच्या पावसाने झालेले शेतकऱ्यांचे नुकसान शेतकऱ्यावरील संकट आहे. ते दूर करण्यासाठी शासन त्यांच्या खंबीरपणे पाठिशी उभे असल्याचा विश्वास शेतकऱ्यांना पालकमंत्री श्री. शिंदे यांनी दिला. तसेच प्रशासनाने सर्व शेतकऱ्यांचे वेळेत पंचनामे करावेत,अशा सूचनाही केल्या.यावेळी त्यांच्या समवेत खासदार अनिल देसाई,  कन्नडचे आमदार उदयसिंह राजपूत, जिल्हा परिषद अध्यक्ष देवयानी डोणगावकर, माजी खासदार चंद्रकांत खैरे उपस्थित होते.
भराडीला भेट
सिल्लोड तालुक्यातील भराडी येथेही पालकमंत्री शिंदे यांनी  बांधावर जाऊन शेतकऱ्यांच्या झालेल्या पिकांच्या नुकसानीची पाहणी केली. यावेळी खा. अनिल देसाई आमदार अब्दुल सत्तार,जिल्हापरिषद् अध्यक्ष देवयानी डोणगावकर,माजी खासदार चंद्रकांत खैरे,बाबूलाल राजपूत अणि इतर उपस्थित होते .
.








Friday, 1 November 2019

पालकमंत्री लोणीकर यांनी विभागीय आयुक्तांच्या कार्यालयात घेतला विविध विकासकामांचा आढावा

पालकमंत्री लोणीकर यांनी विभागीय आयुक्तांच्या
कार्यालयात घेतला विविध विकासकामांचा आढावा

 कामे गुणवत्तापूर्ण व वेळेत पूर्ण करण्याच्या अधिकाऱ्यांना केल्या सूचना 

औरंगाबाद, दिनांक 01 (जिमाका) : राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जालना जिल्ह्याचे पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी जालना जिल्ह्यातील परतूर मतदारसंघातील १७३ आणि व ९५ गावांसाठी वॉटर ग्रीड योजना, परतूर औद्योगिक विकास क्षेत्र आदी कामांचा आढावा आज औरंगाबाद विभागीय आयुक्त कार्यालयामध्ये घेतला. तसेच  कामे गुणवत्तापूर्ण व वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना संबंधित अधिका-यांना दिल्या.
 विभागीय आयुक्तालयाच्या सभागृहात आयोजित बैठकीस आयुक्त सुनील केंद्रेकर, जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे, मुख्य कार्यकारी अधिकारी निमा अरोरा, मुख्य अभियंता आर. एस. लोलापोड, अधीक्षक अभियंता अजय सिंग, गोदावरी महामंडळाचे कार्यकरी संचालक श्री. कोहिरकर, कार्यकारी अभियंता रबडे, श्री. डाकोरे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्री.शिंदे, श्री.शिंगरू आदींसह संबंधित विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते 
पालकमंत्री लोणीकर यांच्या संकल्पनेनुसार जालना जिल्ह्यातील परतूर, मंठा व जालना तालुक्यातील समाविष्ट होणाऱ्या 176 गावासाठी निम्न दुधना प्रकल्पातून कायमस्वरुपी पाणी पुरवठा करण्यासाठी 176 गावांना ग्रीड पद्धतीने पाणीपुरवठा योजना तयार करण्यात आली होती.  परंतु यानंतर परतूर मतदारसंघातील 92 गावांची ग्रीड पाणीपुरवठा योजना मंजूर केली होती,  या योजनेतील बऱ्याच गावांची पाईपलाईन व 176 ग्रीड योजनेची पाईपलाईन एकमेकांना समांतर येत असल्यामुळे पाइपलाइनची पुनरावृत्ती टाळण्यासाठी दोन्ही योजना आता सुधारित केलेल्या आहेत. सुधारित योजनेमध्ये 92 गावांच्या ग्रीड योजनेतील 58 गावांचा समावेश 176 गावांच्या ग्रीड योजनेत करण्यात आला. पूर्वीच्या 176 गावांच्या ग्रीड योजनेतील 61 गावांचा समावेश 92 गावांच्या ग्रीड योजनेत करण्यात आला. त्यामुळे 176 गावांची ग्रीड योजना ही 173 गावांची ग्रीड योजना झालेली आहे.  92 गावांची ग्रीड योजना 95 गावांची झालेली आहे. त्यानुसार सुधारित 173 गावांच्या ग्रीड पाणीपुरवठा योजनेस सुमारे 248 कोटी रुपये खर्च होतील. या योजनेमध्ये मंठा तालुक्यातील एकूण 51 गावे परतूर तालुक्यातील 81 गावे, जालना तालुक्यातील 41 गावे अशी एकूण 170 गावे आहेत. त्याचबरोबर मंठा तालुक्यातील 95 गावांना स्वतंत्र पाणीपुरवठा करण्यासाठी 132 कोटी रुपये किमतीची वाटर ग्रीड शासनाने मंजूर केलेली आहे.
या दोन्ही योजनांना निम्न दुधना प्रकल्पातून पाणीपुरवठा केला जाणार आहे. या योजनेचा उद्देश हा शाश्वत असल्याने शंभर टक्के खात्रीने पाणीपुरवठा होणार आहे, या योजनेचे वैशिष्टये म्हणजे सौरऊर्जाद्वारे पंप चालविण्यात येणार असल्याने विद्युत खर्चात मोठ्या प्रमाणात बचत होणार आहे. स्वयंचलित यंत्रणा बसविण्यात येणार असल्याने आस्थापना खर्चात मोठ्या प्रमाणात बचत होणार आहे.  या योजनेच्या वेगवेगळ्या उपांगांची कामे सध्या प्रगतीपथावर आहेत. बऱ्याच या उपांगांची कामे पूर्ण झालेली आहे, असे आढाव्यात आढळून आले.
या योजनेचा लोकार्पण कार्यक्रम मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस  यांच्या उपस्थितीत नुकताच संपन्न झालेला होता. या योजनेमुळे या तीनही तालुक्यातील 173 गावांना स्वच्छ व शुद्ध पाण्याचा पुरवठा करण्यात येत  आहे. योजनेची उर्वरित व उर्वरित कामे युद्धपातळीवर सुरु आहेत, या प्रगतीपथावरील कामाचा आढावा घेऊन कामे तात्काळ गुणवत्तापूर्ण व वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागांच्या अधिकाऱ्यांना श्री. लोणीकर यांनी दिल्या.
 173 गावांच्या वाटर ग्रीडचे काम पूर्णत्वास येऊन पाणीपुरवठा सुरू करण्यात आल्याने नळ जोडणीबाबतही त्यांनी आढावा घेतला.  या योजनांचा जवळपास 48 हजार 451 कुटुंबांना लाभ होणार आहे. अद्यापपर्यंत 15 हजार 283 कुटुंबांना नळ जोडणी दिली आहे. उर्वरित 32 हजार 118 कुटुंबांना लवकरच नळ जोडणी देण्यात येणार असल्याची माहिती यावेळी संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांनी दिली.
विभागीय आयुक्त श्री. केंद्रेकर यांनी कालबद्ध पद्धतीने कामे करावीत. सर्व योजनांचा सुक्ष्म आढावा  जालना जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सातत्याने घेऊन योजना पूर्णत्वास न्याव्यात, अशा सूचना केल्या.  
मराठवाडा वॉटर ग्रीड
मराठवाडयातील पाणी टंचाई व दुष्काळ कायमस्वरुपी घालविण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मराठवाडा वॉटर ग्रीड प्रकल्प मंजूर केला आहे.  मुख्यमंत्री फडणवीस  यांच्या मराठवाडा वॉटर ग्रीड या महत्त्वकांक्षी प्रकल्पात 11 धरणे 1330 किमी लांबीच्या मुख्य पाईपलाईनद्वारे लूप सिस्टीमने जोडल्या जातील. मराठवाडा वॉटर ग्रीडसाठी एकूण खर्च निधी 25000 कोटी प्रस्तावित आहे. पहिल्या फेज साठी 10 हजार कोटी वापरले जाणार आहेत. या प्रकल्पातून मराठवाडा दुष्काळातून कायमचा मुक्त होणार आहे.
'शेतीचे पाणी, उद्योगाचे पाणी आणि पिण्याचे पाणी यांचा एकत्रित विचार करून 'मराठवाडा वॉटर ग्रीड' प्रकल्प सुरू केला. मराठवाड्याच्या आठ जिल्ह्यांत पिण्यासाठी पुरेसे पाणी उपलब्ध करणे योजनेचे प्रमुख उद्दिष्ट असल्याची माहितीही पालकमंत्री श्री.लोणीकर यांनी यावेळी दिली
परतूर एमआयडीसी 
परतूर शहराचा औद्योगिक विकास व्हावा म्हणून महामंडळालाही 1989 साली  परतूर विकास केंद्राची स्थापना केली आहे. सदर औद्योगिक क्षेत्र वाटुर फाटा ते परतुर या रस्त्यावर परतूर शहरापासून ३  किलोमीटर एवढ्या अंतरावर आहे. तसेच ते दोन महामार्ग, रेल्वेमार्ग व विमानतळापासूनही जवळ आहे. त्यामुळे हा भाग विकसित होण्यास मोठा वाव आहे,असेही श्री. लोणीकर म्हणाले.





Thursday, 31 October 2019

पदवीधर मतदारांची नोंदणी अधिक प्रमाणात करा - विभागीय आयुक्त सुनिल केंद्रेकर


पदवीधर मतदारांची नोंदणी अधिक प्रमाणात करा
कोणताही पात्र पदवीधर मतदार मतदानापासून वंचित राहू  नये
                       - विभागीय आयुक्त  सुनिल  केंद्रेकर
 


औरंगाबाद, दि-31:  05-औरंगाबाद विभाग पदवीधर मतदार संघाच्या निवडणूकीसाठी पदवीधर मतदारांची नोंदणी करण्याची अंतिम मुदत सहा नोंव्हेंबर आहे. त्यामुळे  कोणताही पात्र पदवीधर मतदार मतदानापासून वंचित राहू नये यासाठी विभागातील प्रत्येक पदनिर्देशित  निवडणूक अधिकाऱ्यांनी आपल्या भागातील पदवीधर मतदारांची जास्तीत जास्त प्रमाणात नोंदणी करण्याचे निर्देश विभागीय आयुक्त तथा मतदार नोंदणी अधिकारी सुनिल  केंद्रेकर यांनी  संबंधीतांना दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन सभागृहात आज विभागीय आयुक्त तथा मतदार नोंदणी अधिकारी सुनिल  केंद्रेकर यांच्या अध्यक्षतेखाली अप्पर जिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी, तहसीलदार यांचेसाठी "पदवीधर मतदारसंघ निवडणूक" प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. यावेळी उपस्थित जिल्हाधिकारी तथा सहा. मतदार नोंदणी अधिकारी उदय चौधरी ,उपायूक्त वर्षा ठाकूर, पराग सोमण,अप्पर जिल्हाधिकारी भानूदास पालवे, अविनाश पाठक यांनी  पदवीधर मतदारांची नोंदणी संदर्भात मार्गदर्शन केले. तर उपजिल्हाधिकारी श्री.अरगुंडे आणि शिवाजी शिंदे यांनी पदवीधर मतदार संघासाठी पात्र मतदारांची नोंदणी करावयाचा कार्यक्रमासंबंधी सादरीकरणाव्दारे उपस्थितांना मार्गदर्शन केले. तसेच उपजिल्हाधिकारी पी.आर.कुलकर्णी यांनी प्रशिक्षणाचा समारोप केला.
यावेळी, मतदारांच्या नोंदणीसाठी प्राप्त अर्जांवर तात्काळ अचुक व गतीने निर्णय घेऊन त्याची संगणक प्रणालीवर नोंद घ्यावी. त्याबाबतचा अहवाल वेळेवर सादर करण्याची सूचना यावेळी केंद्रेकर यांनी केली.
जिल्हाधिकारी श्री. चौधरी  यांनी पदवीधर मतदारांची यादी अद्ययावत करून नवीन पात्र मतदारांची अचुकपणे नोंदणी करण्याच्या कामास गती देण्याची सुचना केली. सर्व अधिकाऱ्यांनी नमुना नं. 18 नुसार दाखल अर्जाची कसून तपासणी करावी व मुळ अभिलेख्यांशी ती माहिती पडताळून घ्यावी असेही त्यांनी स्पष्ट केले. तसेच श्रीमती ठाकूर यांनीही सर्व निवडणूक अधिकाऱ्यांनी आपल्या भागातील  सर्व शासकीय कार्यालये, सर्व विद्यापीठे येथील पदवीधर मतदार नोंदणीला प्राधान्य द्यावे व अधिकाधिक पदवीधर मतदारांची नोंदणी करुन लवकरात लवकर अहवाल सादर करण्याची सुचना केली.
       मतदार नोंदणी नियम १९६० अंतर्गत नियम ३१ (३) अन्वये महाराष्ट्र विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी औरंगाबाद विभाग पदवीधर मतदार संघासाठी पात्र मतदारांची नोंदणी करावयाचा कार्यक्रम  ०१ ऑक्टोबरपासून जाहीर झाला आहे. मतदार नोंदणीसाठी एक ऑक्टोबर ते सहा नोव्हेंबर या कालावधीत पात्र पदवी अहर्ता, पात्र तत्सम अर्हता व्यक्तींना नमुना नं.१८ मध्ये मतदार नोंदणीसाठी अर्ज करता येईल. अर्जाचा नमुना तहसील कार्यालय, उपविभागीय अधिकारी कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये विनामुल्य उपलब्ध आहे. या नोंदणीसाठी एक नोव्हेंबर २०१९ या अर्हता दिनांकापूर्वी किमान तीन वर्ष अगोदर पात्र पदवी अर्हता अथवा तत्सम पात्र पदविका इ. धारण करणा-या व्यक्तींना अर्ज करता येणार आहे. नमुना १८ च्या अर्जासह मूळ कागदपत्रे अथवा राजपत्रित अधिका-याकडून सांक्षांकित केलेल्या सत्यप्रती सोबत जोडणे आवश्यक आहे. अर्जदार ज्या ठिकाणी अर्ज करेल त्या ठिकाणचा सामान्यत: रहिवासी असावा. अर्जासोबत पदवी , पदविका परीक्षेचे अंतिम गुणपत्रक देखील ग्राह्य धरले जाईल. मात्र, गुणपत्रकान्वये सदर व्यक्ती पास किंवा उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणित झाले असले पाहिजे.
शासकीय कार्यालयात सामाजिक उपक्रमामध्ये काम करणा-या व्यक्तीच्या अर्हताबद्दल संस्थेकडील अभिलेख पाहून कार्यालय प्रमुखांना मतदार नोंदणीसाठी विहित नमुन्यात प्रमाणपत्र देता येईल. तसेच विद्यापीठांकडील पदवीधारकांची नोंदणी, अभियंत्यांची नोंदणी, विधी अभिकर्त्याची नोंदणी, वैद्यकीय व्यावसायिकांची नोंदणी , सनदी लेखापालांची नोंदणी आदी नोंदणीबाबतचा दाखला अर्जासोबत अर्हतेबाबत पुरावा म्हणून देता येईल. तसेच राजकीय पक्ष संघटना अथवा कोणत्याही व्यक्तीस एका गठ्ठा अर्ज मिळणार नाहीत, तसेच एक गठ्ठा पद्धतीने अर्ज स्वीकारलेही जाणार नाहीत. मात्र, एका कुटुंबासाठी अथवा कार्यालय प्रमुख अथवा संस्थेस त्यांच्या कार्यालयातील कर्मचा-यांसाठी अर्जाची एकत्रित मागणी करता येईल व एकत्रित अर्ज सादर करता येतील.
                           प्राप्त मतदारांची प्रारूप यादी २३ नोव्हेंबर रोजी जाहीर करण्यात येऊन २३ नोव्हेंबर ते नऊ डिसेंबरपर्यंत संबंधितांना दावे, हरकती नोंदविता येतील. दिनांक ३० डिसेंबर रोजी मतदारांची अंतिम यादी जाहीर करण्यात येणार आहे.यावेळी  उपस्थित उपजिल्हाधिकारी,तहसीलदार यांच्या शंकाचे निरसन करण्यात  आले.



Wednesday, 30 October 2019

एकतेचा संदेश देत धावले औरंगाबादकर…

नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद,राष्ट्रीय एकता दिन उत्साहात साजरा

औरंगाबाद,दिनांक 31 (जिमाका)- लोहपुरुष,देशाचे माजी उपप्रधानमंत्री, गृहमंत्री सरदारवल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त प्रत्येक वर्षी राष्ट्रीय एकतेचा संदेशदेण्यासाठी  एकता दौड (रन फॉर युनिटी) कार्यक्रमाचे आयोजन केले जाते.औरंगाबादेत आज सकाळी क्रांती चौक ते महावीर चौक (बाबा पेट्रोल पंप) पर्यंतएकता दौडचे आयोजन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले होते. या एकता दौडमध्ये नागरिकांचाउत्स्फूर्त प्रतिसाद होता. क्रांती चौक येथे आयोजित कार्यक्रमास सुरूवातीला सरदार वल्लभभाई पटेल तसेच श्रीमती इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेला महापौरनंदकुमार घोडेले, जिल्हाधिकारी उदय चौधरी, पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद, उपजिल्हाधिकारी रिता मैत्रेवार यांनीपुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. तसेच सर्व उपस्थितांना राष्ट्रीय एकता दिनाची शपथदेऊन एकता दौडला मान्यवरांनी हिरवी झेंडी दाखवली.  तसेच दौडमध्ये सहभागीही झाले.  दौडमध्ये लहान मुलांसह युवक-युवती, पोलीसअधिकारी-कर्मचारी यांच्यासह महसूल, क्रीडा, महानगरपालिका आदीविभागातील अधिकारी- कर्मचारी मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते.                                                      *विजेत्यांना बक्षीसांचे वितरण*
 तीन टप्प्यात विभागलेल्या एकता दौडमधील सहभागी स्पर्धकांना मान्यवरांनी बक्षीस देऊन गौरविले. पाच कि.मी गटामध्ये प्रथम,द्वितीयआणि तृतीय अनुक्रमे संतोष वाघ, परवेज महेबूब आणि गौतम वाकळे यांनी क्रमांकपटकावला. तीन कि.मीमध्ये राम लिंभारे, ‌ऋषीकेश लिंभारे, साई अंबे यांनी तर दीड कि.मीमध्येपुरूष गटामध्ये अभिषेक निंबाळे, ऋषीकेश  जैस्वाल, अजय वाघ आणि महिला गटामध्ये सुमय्यामहेबूब सय्यद, वैदेही लव्हांडे व आम्रपाली अंभोरे विजेते ठरले. विजेत्यांना मान्यवरांच्याहस्तेचषक देऊन गौरविण्यात आले. तर पाच वर्षीय चिमुकला दानिश आमेर शेख याने स्पर्धेत सहभाग घेतल्याबद्दल त्याचेही कौतुक मान्यवरांनी केले.





संचालक (माहिती) कार्यालयाने घेतली
भ्रष्टाचार निमुर्लनाची शपथ


        औरंगाबाद, दि. 30(विमाका)  – ‘दक्षता जनजागृती सप्ताहानिमित्त’ संचालक (माहिती) माहिती व जनसंपर्क विभागीय कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचा-यांना संचालक गणेश रामदासी यांनी आज भ्रष्टाचार निमुर्लनाची सत्यनिष्ठा शपथ दिली.
         या वेळी बुलढाणा जिल्हा माहिती अधिकारी शंकर बावस्कर तसेच जिल्हा माहिती कार्यालय, माहिती केंद्र, औरंगाबाद येथील अधिकारी आणि कर्मचारी उपस्थीत होते.  शपथ घेतल्यानंतर दक्षता जनजागृती सप्ताहानिमित्त राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी दिलेल्या संदेशाचे माहिती सहायक शाम टरके यांनी वाचन केले.  कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तथा महत्व  माहिती सहायक रेखा पालवे यांनी विशद केले.
        राज्यात दरवर्षी दक्षता जनजाग्रती सप्ताह आयोजित करण्यात येतो. यावर्षी 28 ऑक्टोबर ते 2 नोव्हेंबर या कलावधीत दक्षता जनजागृती सप्ताहाचे आयोजन ‘इमानदारी- एक जीवनशैली’ ही संकल्पना घेऊन साजरी केली जात आहे.
0000000000000